-
हॅन्डबॅग ही आपल्या रोजच्या जीवनात अगदीच महत्वाचा भाग बनली आहे. प्रत्येकवेळी बॅग खरेदी करताना नेमकं कोणती खरेदी करावी हा प्रश्न आपल्याला पडतो.
-
बाहेर जाताना लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण बॅगेत ठेवत असतो आणि मग अशावेळी जर का ती बॅग तुटली तर मोठी पंचाईत होते.
-
अशी पंचाईत होऊ नये म्हणून बॅग विकत घेतानाच काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
-
हल्ली बाजारात विविध प्रकारच्या, आकाराच्या, रंगाच्या बॅग उपलब्ध आहेत मग अशावेळी नेमकी कोणती बॅग आपल्यासाठी योग्य हे कसं निवडायचं याच्या काही टिप्स आहेत.
-
कलाकारांनी फॅशन म्हणून हाती घेतलेल्या बॅग्स बऱ्याचदा फोटोशूट किंवा कार्यक्रमाला जाण्यापुरता मर्यादित असतातत्यामुळे त्या लहान आणि दिसण्यापुरता कामाच्या असतात.
-
अशावेळी त्यांचा ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात गल्लत होते आणि चुकीची बॅग खरेदी केली जाते.
-
बॅग निवडताना नेहमी तुमच्या प्रोफेशनचा विचार करून त्याला उपयुक्त ठरेल अशी बॅग निवडा.
-
बॅगचा आकार अति लहान किंवा अति मोठा नसावा, पाहिजे तेवढं सामान सहज मावेल इतकी प्रशस्त बॅग हवी.
-
बॅग खरेदी करताना तिची क्वालिटी तपासून घेणं अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे थोडी अधिकची किंमत मोजावी लागली तरी चालेल पण क्वालिटी प्रोडक्टच विकत घेऊ असं धोरण बाळगा.
-
बॅग निवडताना गुणवत्तेसोबतच तिचा रंगदेखील तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो त्यामुळे बॅगचा रंग हा अधिकतर प्रमाणात न्यूट्रल शेडमध्ये मोडेल आणि फार डोळ्यात खुपणार नाही असा निवडावा. उदा. काळा, सफेद, तपकिरी इत्यादी.
-
बॅग घेण्यापूर्वी तिची समावेशकता किती हे नीट पाहावे. एकच खण असलेली बॅग न निवडता जास्त खणांची बॅग निवडावी जेणेकरून वस्तू जागेवर राहतील आणि वेळेवर सापडतील.
-
बॅग खरेदी करताना ती अनेक ठिकाणी वापरता येईल अशी निवडावी म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांना आणि कपड्यांवर ती सहज शोभेल. (Photos: Freepik)

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा