-
लठ्ठपणाची समस्या हल्ली वाढली असून अनेकजण त्याने ग्रासलेले आढळतात. म्हणूनच त्याबद्दल जनजागृतीसाठी ४ मार्च हा दिवस जागतिक लठ्ठपणा दिन म्हणून पाळला जातो.
-
१९७५ पासून लठ्ठपणाचे प्रमाण तिपटीने वाढल्याचे निदर्शनास आले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
-
लठ्ठपणामुळे भविष्यात अनेक व्याधी उद्भवण्याची शक्यता असते.
-
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टींचा अवलंब केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.
-
सकाळी नाश्त्यात अंड्याचा समावेश करावा. अंड्यात असणाऱ्या प्रथिनांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
ओट्स, ब्राऊन राईस अशा फायबरयुक्त धान्यांचा आहारात समावेश करावा. हे धान्य शरीरातील मेटाबॉलिक हेल्थ संतुलित ठेवते.
-
कडधान्यांचा आहारात समावेश करावा. त्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.
-
आहारात शेंगदाणे, आक्रोड, आणि बदाम यांचा समावेश करावा. त्याने वजन घटवण्यास मदत होऊ शकते.
-
पालेभाज्यांत फायबरचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो. म्हणून आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.
-
दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाण सर्रास केला जातो करत त्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.
-
वजन घटवण्यासाठी ग्रीन टी ही अत्यंत उपयुक्त असून रोजच्या सेवनाने शरीरातील मेटॅबॉलिसम वाढते आणि अधिकचा मेद कमी करण्यास मदत होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार