-
उन्हाळा सुरु झाला असून सगळेच उन्हामुळे त्रस्त झालेत. अशावेळी पोटाला गारवा म्हणून शीतपेयांचा आधार आपण घेतो.
-
शीतपेयांमुळे मिळणारा थंडावा हा तात्पुरता असून त्यांचे अति प्रमाणातील सेवन हे आरोग्यासाठी घटक ठरू शकते.
-
अशावेळी काहीतरी आरोग्यदायी पेय पिणं आवश्यक असून ताक हा यावर उत्तम पर्याय आहे.
-
ताक अगदी सोपं आणि घरी पटकन बनवता येणारं पेय असून त्याचे अनेक फायदे आहेत.
-
आयुर्वेदानुसार ताकामध्ये बऱ्याच आजारांवर उपयुक्त असे गुणधर्म आहेत.
-
ताक हे कॅल्शियम, पोटॅशियम, आणि व्हिटॅमिन बी१२ ने परिपूर्ण आहे.
-
रोजच्या जेवणातील तिखट आणि तेलकट पदार्थांमुळे जळजळ वाढते आणि अशावेळी ताकातील लॅक्टिक ऍसिडमुळे जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
-
ताक कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असून त्याच्या आहारातील समावेशाने हाडे आणि दात मजबूत होतात.
-
ताकामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
-
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ताकामुळे रक्तदाब नियंत्रित राहू शकतो.
-
उच्च रक्तदाब नियंत्रित झाल्याने हृदयविकार आणि अति तणावासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा