-
सहल हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून अगदी शाळेच्या सहलीपासून ते कुटुंबाच्या सहलीपर्यंत कितीतरी वेळा आपण सहलीला जातो.
-
हल्ली अनेकजण एकट्याने फिरायला जातात म्हणजेच सोलो ट्रॅव्हल करतात.
-
अशावेळी सोलो ट्रॅव्हल करताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालत नाही.
-
एकटं फिरायला जाताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची सहल सुखकर आणि भन्नाट होऊ शकते.
-
एकटं सहलीला जाताना सगळ्यात आधी निवडलेल्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती करून घ्यावी.
-
एकटं फिरणार असल्याने कधीच गरजेपेक्षा जास्त आणि वायफळ सामान स्वतःजवळ बाळगू नये.
-
जेवढं गरजेचं आहे आणि उपयुक्त असेल तेवढ्याच वस्तू नेणं नेहमी चांगलं.
-
नेमकं कुठे जायचं आहे, कोणत्या स्थळांना भेटी द्यायच्या आहेत हे आधीच निश्चित करून ठेवावे.
-
नेहमी ‘Plan B’ तयार ठेवावा म्हणजे अचानक जर मूळ योजना रद्द करावी लागली तरी नवीन प्लॅन असल्याने दिवस वाया जाणार नाही.
-
ट्रॅव्हल कॉस्टचा आढावा नेहमी न चुकता घ्यावा आणि त्यानुसार आवश्यक तेवढे पैसे जवावलं बाळगावे म्हणजे काही गरज लागली तर आयत्यावेळी पंचाईत होणार नाही.
-
गरजेपेक्षा जास्त पैसे जवळ बाळगू नयेत कारण बऱ्याचदा ते चोरी होण्याची भीती असते तसेच वायफळ खर्चदेखील होऊ शकतो.
-
एकटं फिरायला जाताना नेहमी दिवसातील थोडा वेळ हा स्वतःसाठी काढून दिवसभरातील घडामोडींचा आढावा घ्यावा. (Photos: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”