-
ज्योतिष शास्त्रात अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. यामुळे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय सोपे झाले आहे.
-
ग्रह-तारे, कुंडली याच्याप्रमाणे नावाच्या पहिल्या अक्षरावरूनही एखाद्या व्यक्तीविषयी जाणून घेता येते. यावरून आपण संबंधित व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य इत्यादीबाबत माहिती मिळवू शकतो.
-
ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्या वेळी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मुलाचे नाव ठेवले जाते. यावेळी त्याला त्याची रासदेखील मिळते. राशीनुसार आपल्याकडे बाळाचे नाव ठेवण्याची पद्धत आहे.
-
आज आपण अशा नावांच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ज्योतिष शास्त्रानुसार खूप भाग्यवान मानले जाते. असे म्हटले आहे की या मुली ज्या घरात जन्माला येतात, त्या घरातील लोकांचे नशीब चमकू शकते.
-
ज्या मुलींचे नाव A अक्षराने सुरू होते, अशा मुली भाग्यवान मानल्या जातात. असेही म्हटले जाते की ज्या घरात त्यांचे लग्न होते त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. या मुली जे काम हातात घेतात, ते पूर्ण करूनच दाखवतात.
-
ज्योतिष शास्त्रानुसार, C अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या मुली जीवनात मोठे यश मिळवतात. या मुली समाजात एक वेगळे स्थान निर्माण करतात आणि प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोऱ्या जातात. असेही म्हटले जाते की या मुलींना कधीही पैशांची कमतरता भासत नाही.
-
त्याचबरोबर, ज्या मुलींचे नाव L अक्षराने सुरू होते, अशा मुली प्रत्येक संकटात आपल्या कुटुंबाला आधार देतात. परिस्थिती कशीही असली तरी त्या आपल्या कुटुंबाची साथ सोडत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, या मुलींचे वैवाहिक जीवन यशस्वी असते.
-
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या मुलींचे नाव P ने सुरू होते, त्यांचे वागणे अतिशय सौम्य असते. अशा मुली सहज सर्वांना आपलेसे करतात. त्या ज्या घरात जन्माला येतात, तिथे नेहमी सुखसमृद्धी नांदते. या मुलींचे पती आयुष्यात खूप प्रगती करतात, असे म्हटले जाते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Pexels)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”