-
तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणं हा एकूण स्वच्छतेतील एक महत्वपूर्ण भाग आहे.
-
अन्न तोंडावाटे पोटात जातं त्यामुळे तोंडाची निगा राखणं अत्यंत आवश्यक आहे.
-
निरोगी तोंडासाठी हिरड्या निरोगी ठेवणं आवश्यक आहे.
-
निरोगी हिरड्यांसाठी रोज माऊथवॉश वापरावा. यामुळे तोंडातील विषाणू मरतात.
-
नैसर्गिक घटकांचा समावेश असेलला माऊथवॉश वापरावा.
-
कोरफड, टी ट्री ऑईल, लवंगाचं तेल यांसारख्या नैसर्गिक गोष्टींच्या वापराने हिरड्यांच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.
-
धूम्रपानाने हिरड्यांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. निरोगी हिरड्यांसाठी धूम्रपान टाळावे.
-
तणावामुळे शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली मंदावते म्हणून तणावमुक्त राहण्याकडे कल असावा.
-
निरोगी हिरड्यांसाठी दिवसातून दोन वेळा दात स्वच्छ घासावे.
-
व्हिटॅमिन्स, मिनरल्सयुक्त पदार्थांचा समावेश आहारात करावा त्याने हिरड्या मजबूत होतात.
-
दातांत आणि हिरड्यात अडकलेले अन्नकण फ्लॉस करून काढून टाकावे जेणेकरून दात आणि हिरड्या दोन्ही निरोगी राहतील.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार