-
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देश आणि जगावर दिसून येतो.
-
धन आणि समृद्धी देणारा शुक्र ग्रह १२ मार्च मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींवर या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
-
शुक्र ग्रहाला धन, वैभव, भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानलं जातं. ज्या जातकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह उच्च स्थानात असतो. त्यांना नावलौकीक मिळतो. शुक्र हा ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे.
-
शुक्र ग्रहाचं गोचर काही राशींसाठी संपत्ती आणि प्रगतीचे योग घेऊन येणारा असू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
शुक्राचा राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीतील लग्न घरामध्ये शुक्र ग्रहाचे भ्रमण होईल. त्यामुळे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. यासोबतच विवाहित लोकांना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतो.
-
या काळात नशिबाची चांगली साथ मिळू शकते. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकतो. दुसरीकडे, शुक्र ग्रह हा तुमच्या संपत्तीचा आणि सातव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होऊ शकते. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
-
शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकते. कारण शुक्र तुमच्या राशीतून उत्पन्नाच्या स्थानावर गोचर करणार आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. यासोबतच उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होऊ शकते. दुसरीकडे, विवाहित लोकांना जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतो.
-
याकाळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, व्यापार्यांची कोणतीही मोठी डील फायनल होऊ शकते. त्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकतो. दुसरीकडे, जर तुम्हाला या कालावधीत स्टॉक मार्केट आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. हा काळ अनुकूल ठरु शकतो.
-
धनु राशीच्या मंडळीसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करेल. जी संतती आणि प्रेम-संबंधाची भावना मानली जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.
-
यासोबतच संतती सुख प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला ठरु शकतो. दुसरीकडे, व्यावसायिकांना विविध मार्गांनी पैसे मिळवण्यात यश मिळू शकते. यासोबतच नोकरी व्यवसायातील लोकांना पदोन्नती मिळू शकते.
-
( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)
पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ