-
काही वर्षांपूर्वी मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासारखे आजार केवळ वयस्कर लोकांनाच होतात असा समज होता. मात्र, बदललेली जीवनशैली, चुकीच्या सवयी, अयोग्य आहार यामुळे सर्व चक्रच बिघडलं आहे.
-
आजकाल कमी वयातच अशी काही शारीरिक लक्षणे दिसू लागतात, जी आपल्याला या गंभीर आजारांचे संकेत देतात. सध्या २०-३० या वयोगटातील लोकांमध्येही काही लक्षणे दिसू लागली आहेत, जे थेट हृदयविकरच्या धोक्याचा संकेत देतात.
-
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, थकवा आणि चिंता जाणवत असल्यास या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
-
आजकाल, कमी वयात हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित इतर आजारांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये २० ते ३० वयोगटातील लोकांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
-
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी वयातच दिसून येणारी किरकोळ लक्षणे कालांतराने हृदयविकरचे कारण बनू शकते.
-
हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना अनेकदा चिंता किंवा भीती वाटत राहते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सतत बदलणारे हृदयाचे ठोके, समस्या वेदना आणि तणाव यामुळे भीती वाढू लागते.
-
तुमचे वयही २०-३०च्या मध्ये असेल आणि तुम्हालाही या कारणांमुळे सतत भीती, चिंता जाणवत असेल तर वेळीच योग्य त्या तपासण्या करून घ्याव्या.
-
असे म्हटले जाते की जेव्हा धमन्यांमध्ये पेरिफेरल आर्टिरियल डिसीजची समस्या असते तेव्हा त्या पातळ होऊ लागतात किंवा ब्लॉक होतात.
-
जेव्हा पायांच्या धमन्यांमध्ये हे घडते तेव्हा वेदना सुरू होतात. कमी वयात हे घडणे हा एक धोकादायक संकेत असू शकतो.
-
ज्या लोकांना हृदयाची समस्या आहे त्यांना पोटाशी संबंधित समस्यांमुळेही त्रास होतो. पोटाच्या वरच्या भागात अचानक अचानक वेदना होणे चांगले नाही. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
-
थकवा येण्याला हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराचे महत्त्वाचे लक्षण म्हणता येणार नाही, परंतु ते प्राणघातकही ठरू शकते. पूर्ण झोप नसली तरी थकवा येऊ शकतो, पण वारंवार थकवा येत असेल तर तपासणी करून घ्यावी.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos : Freepik)

Kunal Kamra Controversy : “मी जिथे राहत नाही तेथे जाणं म्हणजे…”; कुणाल कामराची सूचक पोस्ट, मुंबई पोलिसांना डिवचलं?