-
वाढलेलं वजन कमी करणं फारच कठीण काम असतं.
-
योग्य सवयीचा आणि आहाराचा जीवनात अवलंब केल्यास ही कठीण वाटणारी गोष्ट सहजरित्या सोपी होऊ शकते.
-
कमी आहार घेण्यापेक्षा योग्य आहार घेणं हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचं असतं.
-
प्रथिनांनी युक्त, फायबरने भरपूर आणि उपयुक्त फॅट्स यांनी बनलेल्या ट्रेल मिक्सचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते. यात सुकामेवा, बिया, नट्स अशा पदार्थांचा समावेश असतो.
-
वजन कमी करण्यासाठी आहारात फळे आणि सुक्यामेव्याने बनलेल्या बारचा समावेश करावा. यात कमी प्रमाणात कॅलरीज अजून फायबरचे प्रमाण अधिक असते.
-
भाजलेले चणे आहारात समाविष्ट केल्यास वजन घटवण्यास ते फायदेशीर ठरू शकतात. चण्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते.
-
प्रथिनांनी युक्त ग्रीक योगर्ट वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.
-
सोयाबीनच्या बियांतील प्रथिने, फायबर हे वजन घटवण्यास फायदेशीर ठरू शकतं.
-
हलके फुलके वाटणारे पॉपकॉर्न फायबरयुक्त असतात आणि त्यात कॅलरीजदेखील कमी असतात. त्यांचा समावेश आहारात एकला असता वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू शकतात.
-
फळं, भाज्या अशा हेल्दी गोष्टींनी बनलेली स्मूदी वजन घटवण्यास उपयुक्त ठरू शकते.
-
उकडलेल्या अंड्यात प्रथिनांचे प्रमाण कधिक असल्याने त्याचाही समावेश तुम्ही आहारात करू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik)

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा