-
ओठांची निगुतीने काळजी घेणं हा देखील स्कीनकेअरचाच एक भाग आहे.
-
थंडीमुळे ओठ कोरडे पडतात तेव्हा त्यांची निगा राखण्यासाठी फार स्कीनकेअर रुटीन फॉलो केलं जातं.
-
काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास ओठांची काळजी उत्तमरित्या राखता येऊ शकते आणि ओठही नैसर्गिकरित्या गुलाबी होऊ शकतात.
-
एक चमचा मधात एक चमचा साखर मिसळून याने ओठांना आठवड्यातून दोन वेळा स्क्रब केल्यास ओठांचा रंग उजळतो आणि साखरेतील अँटिऑक्सिडंट्समुळे उन्हापासून ओठांचे रक्षण होते.
-
एक चमचा दुधात अर्धा चमचा हळद घालून ही पेस्ट ओठांवर ५ मिनिटे लावल्यास ओठांचा रंग उजळू शकतो.
-
हळद आणि दुधाच्या मिश्रणामुळे ओठांवरील मृत त्वचेचे आवरण निघून जाण्यास मदत होते.
-
रात्री झोपण्यापूर्वी कोमट तूप नाभीला लावल्यास ओठांवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
-
कोरफडीच्या गरात काही थेंब नारळाचे तेल घालून ते मिश्रण थंड करून नंतर लिपबाम सारखे वापरू शकता.
-
बीटाचा रस मधात मिसळून तो लिपबामसारखा वापरू शकता त्याने ओठांचा रंग उजळण्यास मदत होते.
-
रात्रभर दुधात भिजवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून ती ओठांना १५ मिनिटांसाठी लावली असता त्यामुळेदेखील ओठांचा रंग उजळू शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.
-
(Photos: Freepik)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित