-
वाढता ताण-तणाव, अयोग्य जीवनशैली, चुकीचा आहार यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. सतत तणावात राहिल्याने रक्तदाब आणि मधुमेह अशा आजारांचा धोका वाढू लागतो. या आजारांमुळे स्ट्रोकचा धोकादेखील वाढू शकतो.
-
स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे, जेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबतो आणि दूसरा प्रकार म्हणजे सायलेंट स्ट्रोक.
-
सायलेंट स्ट्रोकची लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. शरीराची हालचाल आणि बोलणे यासारख्या कार्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागावर सायलेंट स्ट्रोक परिणाम करतो.
-
जेव्हा मेंदूच्या भागात रक्त परिसंचरण अचानक थांबते, तेव्हा सायलेंट स्ट्रोक येतो. यामध्ये मेंदूच्या पेशींचे नुकसान होते.
-
मेडिकोव्हर हॉस्पिटल येथील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, डॉ. तेजस सकळे यांच्या मते, मेंदूच्या खराब झालेल्या भागानुसार स्ट्रोकची लक्षणे बदलू शकतात. सायलेंट स्ट्रोकची लक्षणे कोणती आहेत आणि त्यावर उपचार कसे करावेत हे जाणून घेऊया.
-
स्मरणशक्ती कमी होणे.
-
शरीराचा समतोल राखण्यात अडचण येणे. सतत तोल जाणे.
-
अचानक मूड बदलणे.
-
सतत लघवीला होणे.
-
विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे.
-
सायलेंट स्ट्रोक किती धोकादायक असू शकतो?
-
सायलेंट स्ट्रोकचा प्रभाव मेंदूवर दीर्घकाळ राहतो. सायलेंट स्ट्रोकनंतर, रुग्णाला गोष्टी लक्षात ठेवणे कठीण होते.
-
सायलेंट स्ट्रोक आल्यानंतर रुग्णाचे लक्ष कोणत्याही एका गोष्टीवर केंद्रित नसते.
-
सायलेंट स्ट्रोकमुळे विनाकारण रडणे किंवा हसणे यासारख्या भावनिक समस्या उद्भवू शकतात. तसेच, रुग्णाला अस्वस्थ वाटत राहते.
-
सायलेंट स्ट्रोक टाळण्यासाठी दररोज ३० मिनिटांपर्यंत व्यायाम करावा. दररोज व्यायाम केल्याने सायलेंट स्ट्रोकची शक्यता ४० टक्क्यांनी कमी होते.
-
वजनावर नियंत्रण ठेवावे. वाढत्या वजनामुळे आपण अनेक जुनाट आजारांना बळी पडू शकतो. सायलेंट स्ट्रोक टाळण्यासाठी वजन नियंत्रण आवश्यक आहे. यासाठी निरोगी जीवनशैली आणि निरोगी आहाराचे पालन करावे.
-
मादक पदार्थांचे सेवन टाळावे. तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन केल्याने स्ट्रोक होऊ शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : Freepik)
अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक