-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
देवतांचा स्वामी गुरु ग्रह एप्रिलमध्ये मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
-
गुरु ग्रह ज्योतिषातील एक अत्यंत शुभ ग्रह आहे. वैदिक ज्योतिषात याला खूप महत्त्व आहे. गुरू ग्रह धनु आणि मीन राशीचा मालक आहे.
-
गुरु ग्रहाचे गोचर काही राशींसाठी शुभ व फलदायी ठरु शकते. त्यांना या काळात आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. कारण देवगुरुंची दृष्टी प्रगती, धन आणि संतती या स्थानावर असेल. यासोबतच दुसरी दृष्टी तुमच्या नशिबावर पडेल त्यामुळे येत्या १५ महिन्यांत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.
-
तसेच धर्म-अध्यात्मात तुमची आवड वाढेल. दुसरीकडे, व्यापारी वर्गासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. यासोबतच गुंतवणुकीच्या क्षेत्रात गुंतलेल्यांना आर्थिक लाभही मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना परीक्षेत यश मिळू शकतो.
-
गुरुच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण बृहस्पति तुमच्या गोचर कुंडलीच्या लाभदायक स्थानात भ्रमण करेल. त्यामुळेच यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
यासोबतच त्याची दुसरी दृष्टी तुमच्या संक्रमण कुंडलीतील वैवाहिक जीवनावर असेल. त्यामुळे यावेळी तुमचे कार्य सिद्धीस जाईल. यासोबतच मनोकामनाही पूर्ण होतील. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या जोडीदाराची प्रगती होण्याची शक्यता आहे.
-
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण कुंडलीतील कर्म भावात गुरु संक्रमण प्रवास करेल. जे नोकरी आणि कामाचे ठिकाण मानले जाते. म्हणूनच या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
यासोबतच कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

४ एप्रिल पंचांग: ग्रहमान ‘या’ राशींसाठी शुभ-फलदायी ठरणार! कोणाचा वाढेल कामात उत्साह तर कोणाचा चर्चेतून निघेल मार्ग