-
बहुतेकांना काही भाज्या खायला आवडत नाहीत. यामध्ये मुळा, शेपू, गवार यांसारख्या अनेक भाज्यांचा समावेश असतो. मात्र, या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात.
-
अशीच एक फळभाजी म्हणजे ढोबळी मिरची. यालाच आपण शिमला मिरची असेही म्हणतो. तुम्हालाही ही भाजी खायला आवडत नसेल तर या भाजीमुळे होणारे फायदे वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
-
ढोबळी मिरची आपल्या निरोगी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी भाजी आहे. यामध्ये असणारे गुणधर्म कॅन्सरसारख्या गंभीर आजारवरही प्रभावी ठरू शकतात असे काही आरोग्यतज्ञांचे म्हणणे आहे.
-
ढोबळी मिरची खालल्याने आपल्याला कोणकोणते आश्चर्यकारक फायदे होऊ शकतात ते जाणून घेऊया.
-
ढोबळी मिरची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यात जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात आढळतात.
-
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ढोबळी मिरचीचे सेवन केल्याने तणाव आणि दमा सारख्या आजारांमध्येदेखील फायदा होतो.
-
ढोबळी मिरची वजन कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात आणि ते खाल्ल्याने वजन कमी होते. हे शरीरातील मेटाबॉलिजम सुधारते.
-
ढोबळी मिरचीचे सेवन डोळ्यांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए उपलब्ध आहे जे डोळ्यांसाठी चांगले मानले जाते. म्हणूनच जर तुम्ही ढोबळी मिरचीचे सेवन सुरू केले तर तुमचेच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहतील.
-
ढोबळी मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ढोबळी मिरचीचे सेवन केल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : Freepik)

२८ फेब्रुवारी राशिभविष्य: महिन्याचा शेवटचा दिवस ‘या’ तीन राशींचे भाग्य पालटणार? कोणाला कामातून आनंद तर कोणाला अनपेक्षित लाभ होणार