-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात २२ मार्च पासून होत आहे. तर याच दिवशी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंदू नववर्ष संवत २०८० सुरु होणार आहे.
-
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मीन राशीत ५ ग्रहांचा संगम होत असून नववर्षात दोन राजयोग तयार होणार आहे. बुधादित्य आणि गजकेसरी योगाने नववर्षांची सुरुवात होणार आहे.
-
मीन राशीमध्ये गुरु ग्रहासह सूर्य, बुध, चंद्र, नेपच्यून हे चार ग्रह एकत्र येऊन गुरूसह युती करत आहेत. याचा प्रभाव काही राशींवर अत्यंत शुभ असणार आहे.
-
‘या’ तीन राशींचे गुढीपाडव्यापासून भाग्य चमकणार आहेत, चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
मिथुन राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून जानेवारीतच सुटका झाली आहे.अशात आता हिंदू नववर्षाची सुरुवात आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या वर्षात गुरु ग्रह आपल्या राशीच्या लाभ स्थानात असणार आहेत. तर वर्षाच्या उत्तरार्धात सूर्यदेव लाभस्थानी असणार आहेत.
-
बुधादित्य व गजकेसरी राजयोग आपल्या गोचर कुंडलीत दहाव्या स्थानी तयार होत आहेत. येत्या काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या नव्या संधी लाभू शकतात. तसेच तुम्हाला सध्याच्या कार्यस्थळी प्रचंड मान-सन्मान सुद्धा लाभू शकतो. गुढीपाडव्यानंतर पाच दिवसातच तुम्हाला प्रचंड धनलाभाचे योग आहेत.
-
हिंदू नववर्ष हे सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. बुधादित्य व गजकेसरी राजयोग हा आपल्या राशीच्या अष्टम स्थानी तयार होत आहे. त्यात दोन राजयोग या राशीला आर्थिक उन्नतीकडे घेऊन जाणारे असू शकतात.
-
या काळात तुम्हाला करिअरमध्ये यश मिळू शकतो. तसेच कुटुंबासह प्रवासाचे योगही तयार होत आहेत. तुम्हाला वेळ वाचवण्याचे मार्ग शोधावे लागतील. धार्मिक कामात तुमचा सहभाग वाढू शकतो. तसेच व्यवसायिकांना सुद्धा चांगला धनलाभ होऊ शकतो.
-
धनु राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्षाची सुरुवात अत्यंत लाभदायक असू शकते. हे दोन्ही राजयोग आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानी तयार होत आहेत, यामुळे आपल्याला येत्या काळात सुख व वैभवात वाढ झाल्याचे दिसून येऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ राहू शकतो.
-
या काळात पदोन्नती व पगारवाढीची संधी सुद्धा लाभू शकते. तसेच जी मंडळी रिअल इस्टेट संबंधी काम करतात त्यांना येत्या काळात आर्थिक स्रोत वाढल्याचे जाणवू शकते. व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकतो. नवीन ऑर्डरही मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?