-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर व एकूणच पृथ्वीवर जाणवू शकतो.
-
येत्या चैत्र महिन्यात सुद्धा काही ग्रह अस्ताला जाणार आहेत तर काहींचा उदय होणार आहे. यामुळे एकूणच १२ राशींच्या कुंडलीत हालचाल जाणवून येऊ शकते.
-
गुढीपाडव्याच्या पाच दिवसनंतर ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह उदयास्थितीत असणार आहे. २७ मार्चला ग्रहांचा राजकुमार बुधाचा उदय होताच काही राशींसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात.
-
या संपूर्ण राशीचक्रातील ३ राशी अशा आहेत ज्यांना अपार धनलाभ व प्रचंड प्रगतीचा काळ अनुभवता येऊ शकतो. चला पाहूया कोणत्या आहेत या भाग्यवाशाली राशी…
-
बुध ग्रहाचा उदय हा कर्क राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या भाग्यस्थळी भ्रमण करत आहेत, यामुळे येत्या काळात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. व्यवसायिकांना अर्थजनाचे नवनवीन स्रोत लाभू शकतात.
-
तसेच प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी येणारा काळ अत्यंत शुभ आहे. या येत्या महिन्यामध्ये आपल्याला परदेश प्रवासाचे सुद्धा योग आहेत. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी व गृहिणींसाठी सुद्धा अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकते. तुम्हाला छोट्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा योग येऊ शकतो.
-
बुध ग्रहाचा उदय वृश्चिक राशीच्या मंडळीसाठी अनुकूल ठरू शकतो. आपल्या राशीच्या पंचम स्थानी बुध ग्रहाचा उदय होत आहे. हे स्थान संतती प्राप्ती, प्रेम, वैवाहिक जीवन व प्रगतीचे मानले जाते. यावेळी जे काही काम कराल त्यात यश मिळू शकतो.
-
तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रगतीचा व पगारवाढीचा योग आहे. माता लक्ष्मी अनपेक्षितपणे आपल्या दारी येऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारातून काही अंशी लाभ होण्याची चिन्हे आहेत.
-
बुध देवाचा उदय धनु राशींच्या मंडळीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतो. बुध ग्रह आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी भ्रमण करणार आहे. याकाळात आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. आपण शक्य झाल्यास वाहन व प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवू शकता. यातून तुम्हाला प्रचंड धनलाभाचा योग आहे.
-
आपल्याला आईचे विचार कामी येऊ शकतात. जर तुमचा व्यवसाय खाण्या- पिण्याशी संबंधित असेल तर लवकरच तुमच्या प्रगतीचे दार उघडू शकते. अचानक धनसंपत्तीचे योग बनू शकतात. सामाजिक मान प्रतिष्ठाही वाढू शकते. शैक्षणिक क्षेत्रातही अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड