-
उन्हाळा सुरू होताच अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. शरीर गरम होऊ लागते, त्यामुळे त्वचा आणि पोटाशी संबंधित अनेक आजार होतात.
-
उष्णतेमुळे पोटात गॅसचा त्रास होतो. यामुळे पोटाला सूजही येते. त्याचबरोबर उन्हाळ्यात पोटामध्ये जळजळ आणि पोटदुखी यांचाही खूप त्रास होतो. एवढेच नाही तर पोटाची उष्णता वाढल्यास गॅस्ट्र्रिटिस, पेप्टिक अल्सर, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, अपचन आदी आजार होऊ शकतात.
-
मधुमेहाच्या रुग्णांना उन्हाळ्यात पोटाचा त्रास जास्त होतो. म्हणून या रुग्णांनी उन्हाळ्यात पोट थंड ठेवणे खूप गरजेचे आहे. वास्तविक, आपण जे खातो त्याचा परिणाम सर्वांत आधी पोटावर होतो.
-
उन्हाळ्यात गरम गोष्टी खाल्ल्याने पोटाचे तापमान वाढते, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी पोत थंड राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. मधुमेहाच्या रुग्णांनी पोट थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात या तीन प्रकारच्या पीठाचे सेवन केल्यास त्याचा औषधासारखा परिणाम होऊ शकतो.
-
ज्वारीचे पीठ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्याचबरोबर ते पोटही थंड ठेवते. ज्वारीमध्ये खनिजे, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांसारखे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
-
ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. ज्वारी रक्तातील साखर कमी करते आणि स्वादुपिंडाला इन्सुलिन तयार करण्यासाठी उत्तेजित करते. पबमेड सेंट्रल जर्नलनुसार, ज्वारी पचनशक्ती मजबूत करते आणि टाइप 2 मधुमेह नियंत्रित करते.
-
चणा आणि हरभरा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने आढळतात. उन्हाळ्यात हरभल मोठ्याप्रमाणात खाल्ला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे हरभऱ्याच्या कूलिंग इफेक्टमुळे पोट थंड राहते.
-
चणे आई हरभरा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होऊ शकते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेसनचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
-
आयुर्वेदात जवाच्या पाण्याचे विशेष महत्त्व आहे. तसेच जवाचे पीठही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे वैद्यकीय शास्त्रात सिद्ध झाले आहे.
-
जव शरीराला थंड ठेवते. यामध्ये भरपूर फायबर आढळते. तसेच जवामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात.
-
फूड डेटा सेंट्रल जर्नलनुसार, एक कप जवामध्ये 2.26 ग्रॅम प्रथिने, 76 ग्रॅम मॅग्नेशियम, 108 ग्रॅम पोटॅशियम, 6.11 ग्रॅम प्रोटीन असते. जवाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते खूप फायदेशीर आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : Freepik)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का