-
कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानातून लोक अद्याप सावरलेले नाहीत. त्यातच आता भारतात इन्फ्लुएंझा व्हायरस H3N2 पसरत असून यामुळे लोकांच्या मनात भीती वाढली आहे.
-
कोविड-19 नंतर आता देशात इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 चे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत, इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 ची लक्षणे कशी आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
-
इन्फ्लूएंझा व्हायरस H3N2 च्या लक्षणांमध्ये ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याचबरोबर, असेही आढळून आले आहे की या आजारात उच्च ताप बरा झाल्यानंतरही कोरडा खोकला दीर्घकाळ टिकू शकतो.
-
सरकारने इन्फ्लूएंझा विषाणू H3N2 बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबरोबरच कोविडच्या नियमांचे पालन करत राहण्याचेही सांगण्यात आले आहे.
-
या संदर्भात दिल्लीच्या बीएल कपूर-मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. संदीप नायर यांनी सांगितले की, इन्फ्लूएंझा विषाणू नाक, डोळे आणि तोंडातून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे पसरतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि अंगदुखी यांचा समावेश आहे.
-
हा आजार अशा ऋतुमध्ये पसरत आहे, जेव्हा लोकांना सर्दी-ताप अतिशय सामान्य वाटतो. मात्र बदलत्या ऋतूमध्ये आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे.
-
केवळ औषधेच नाहीत तर सकस आणि निरोगी आहार घेऊनही आपण आपल्या आरोग्याचे रक्षण करू शकतो. आज आपण इन्फ्लूएंझा विषाणू H3N2 विरुद्ध लढण्यासाठी मदत करू शकणाऱ्या डाएट आणि सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया.
-
बदाम हे आवश्यक पोषकतत्वांचे पॉवरहाऊस आहे. बदाम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीदेखील चांगले आहे.
-
बदाम हे रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यास समर्थन देणाऱ्या व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषकतत्वांचा स्त्रोत आहे.
-
हळद हा एक आयुर्वेदिक मसाला आहे जो आपल्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट केला जाऊ शकतो आणि याचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
-
हळदीचा मुख्य घटक असलेला कर्क्युमिन हा दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हळदीचे दूध, हळदीचा चहा किंवा रोजच्या जेवणात याचा वापर करून तुम्ही हलडीचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करू शकता.
-
ग्रीन टी प्यायल्याने केवळ वजन कमी होण्यास मदत होत नाही, तर ग्रीन टीचे इतरही अनेक फायदे आहेत. ग्रीन टीमध्ये रोगाशी लढणारे एपिगॅलोकाटेचिन गॅलेट ही अँटिऑक्सिडेंट असते. याचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊ शकते.
-
कॅल्शियमने समृद्ध असलेले ताक हे एक देशी पेय आहे. ताकामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड रोगप्रतिकारक शक्तीच्या सुरळीत कार्यास मदत करते.
-
उन्हाळ्यात ऊर्जा मिळवण्यासाठी आवर्जून ताकाचे सेवन करावे. तुम्ही यामध्ये खडे मीठ, काळी मिरी, पुदिन्याची पाने आणि इतर मसाले घालून याची चव आणखीनच वाढवू शकता.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : Freepik)

Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक