-
लांब दाट केसांमुळे आपले व्यक्तिमत्व आणखीच आकर्षक होते. मात्र, आजकाल खराब आहार, बिघडलेली जीवनशैली, तणाव आणि प्रदूषणामुळे केसांच्या वाढीवर आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
-
हार्मोन्स, आनुवंशिकता, आहारातील बदल याप्रमाणेच केसांची वाढ कमी होण्यासाठी इतरही अनेक कारणे आहेत. या सर्वांचा केसांच्या वाढीवर परिणाम होतो. वाढता ताणतणाव आणि प्रदूषणामुळे केसांच्या मुळांचे नुकसान होते आणि केस गळू लागतात.
-
केसांची वाढ अनेक टप्प्यांमधून होते. यादरम्यान रोमछिद्र नवीन केसांची निर्मिती करतात. हे फॉलिकल्स योग्यरित्या वाढण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर आवश्यक पोषकतत्वांची आवश्यकता असते. म्हणूनच ज्यांच्या केसांची वाढ कमी आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या आहारात बदल करण्याची गरज आहे.
-
अशा पदार्थांचा आहारात समावेश करा, ज्याच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता सहज भरून निघू शकते. विशिष्ट जीवनसत्त्वांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि केसांची वाढही चांगली होते.
-
जर तुमच्या केसांची वाढ कमी होत असेल, केसांची चमक कमी होत असेल तर आहारात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि व्हिटॅमिन ई समृद्ध फळांचा समावेश करावा.
-
या जीवनसत्त्वांचे सेवन केल्याने केसांची वाढ झपाट्याने होते. केसांची निरोगी वाढ होण्यासाठी आहारात कोणत्या जीवनसत्त्वांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
-
व्हिटॅमिन ए तुमचे केस वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन ए चे योग्य प्रमाणात सेवन करणे केस वाढण्यासाठी प्रभावी ठरते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन एचे सेवन केल्यास टाळू तेलकट होऊ शकते आणि केस गळू शकतात.
-
व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स नावाच्या गटाशी संबंधित असलेले व्हिटॅमिन बी 12 केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 12 केसांच्या फोलिकल्सचे कार्य सुधारते.
-
हे जीवनसत्व डीएनए संश्लेषण आणि मज्जासंस्थेच्या कार्यात मदत करते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस पातळ होतात आणि ते गळू लागतात.
-
व्हिटॅमिन सी केवळ प्रतिकारशक्ती मजबूत करत नाही तर टाळूचे आरोग्यदेखील सुधारते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन सी कोलेजन संश्लेषणास मदत करते. हे प्रोलिन तयार करण्यासाठी आणि केराटिनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे.
-
ब्रोकोली, काळ्या मनुका, काळी मिरी आणि सिट्रस फळे यासारख्या फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (फोटो : Freepik)
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न