-
आजकाल दीर्घकाळ कामामुळे लोक तासंतास कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून काम करतात, मोबाईलवर चित्रपट बघतात, त्यामुळे मानदुखीचा त्रास वाढू लागला आहे. वाढत्या वयाबरोबर ही समस्या उद्भवत असली तरी आता ही समस्या किशोर आणि तरुणांमध्येही दिसून येत आहे.
-
मानदुखीला वैद्यकीय भाषेत ‘सर्वाइकल पेन’ म्हणतात. हे प्रामुख्याने मानेचे दुखणे असते, परंतु त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले जाते आणि त्याची स्थिती गंभीर झाल्यास ती खांद्याद्वारे संपूर्ण हातापर्यंत पोहोचते.
-
ही वेदना अगदी बोटांच्या टोकापर्यंत पोहोचू शकते आणि खांद्यापासून कंबरेपर्यंतचे क्षेत्र व्यापू शकते. या वेदनेमुळे रक्तवाहिनीतून वीज गेल्यासारखी तीव्र वेदना होऊ शकते.
-
कधीकधी या स्थितीला ‘संधिवात’ किंवा ‘मानेचा ऑस्टियोआर्थराइटिस’ असे म्हणतात. हे सहसा वाढत्या वयोमानामुळे होते, परंतु आजकाल जीवनातील वाढती निष्क्रियता आणि एकाच ठिकाणी बसून तासंतास काम करणे यामुळे तरुणांनाही हा त्रास होऊ लागला आहे.
-
मान अवघडणे, मानेमध्ये सूज आणि वेदना, मानेच्या स्नायूंमध्ये वेदना, मान वळवताना आवाज होऊन वेदना, चक्कर येणे, डोकेदुखी, सतत मळमळ, वारंवार मुंग्या येणे किंवा हातपाय सुन्न होणे, खांद्यांची हालचाल करताना दुखणे, लिहिण्यात किंवा टायपिंग करण्यात अडचण इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत.
-
आपण संगणक, लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवर बराच वेळ काम करत असताना किंवा एखादी गोष्ट पाहत असताना आपल्या मानेवर किती ओझे पडत आहे हे विसरतो.
-
खरे तर असे काम करताना आपण डोके खाली वकवून बसतो. आपल्या डोक्याचे वजन किमान पाच ते सात किलो असते. इतका भार सतत आपल्या मानेवर पडत असतो. यामुळे, आपल्या मानेच्या हाडात एक अंतर तयार होते, जे या वेदनांचे मुख्य कारण बनते.
-
याशिवाय बराच वेळ एकाच मुद्रेत बसणे, चुकीच्या आसनात झोपणे, उंच किंवा मोठ्या उशा वापरणे, शारीरिक ताण, कोणत्याही मज्जातंतूवर जास्त दाब पडणे, पाठीच्या कण्यावर दाब पडणे इत्यादी कारणेही असू शकतात.
-
मानेच्या दुखण्यावर असा कोणताही खात्रीशीर उपचार नाही, ज्यामुळे तुम्हाला ही समस्या पुन्हा उद्भवणार नाही. वाढत्या वयाबरोबर असे झाले असेल तर औषधांद्वारे यावर उपचार केले जातात.
-
जर हे जीवनशैलीमुळे, जास्त वेळ बसून राहिल्यामुळे होत असेल तर सुरुवातीला औषधांद्वारे उपचार केल्यानंतर, तुम्हाला तुमची बसण्याची स्थिती बदलण्याचा सल्ला दिला जाईल. तसेच कामाच्या दरम्यान ब्रेक घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, चालणे, धावणे, दोरी-उडी मारण्याचाही सल्ला दिला जातो.
-
जर तुम्ही मानेच्या दुखण्याने त्रस्त असाल तर प्रभावित भागावर बर्फ लावून शेकल्यास तुम्हाला आराम मिळेल. दिवसातून तीन ते चार वेळा असे केल्यास या दुखण्यापासून आराम मिळतो.
-
अनेकदा वाढत्या ताणामुळे मान आणि पाठदुखी सुरू होते. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही हा त्रास सतत जाणवत असेल तर तुमच्या शरीराला विश्रांती द्या.
-
तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी मसाज करता येईल, त्यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल. सतत एकाच जागी बसू नका किंवा जड काहीही उचलू नका.
-
स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि मानेच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे. यामुळे तुमचे शरीर मजबूत होईल आणि वेदनाही कमी होतील. यामध्ये तुम्ही फिजिओथेरपीचीही मदत घेऊ शकता.
-
स्वतःहून वेदनाशामक औषध घेऊन ही वेदना कमी करण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे या वेदनांपासून काही काळ आराम नक्कीच मिळू शकतो, पण किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. केवळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करा.
-
आयुर्वेदातही मानदुखीवर इलाज आहे. अशा अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्यांच्या मदतीने मानदुखीचा उपचार केला जातो. आले, मेथी, अश्वगंधा, गुग्गुळ, हळद आणि निलगिरी इत्यादींचा वापर वेदना कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-
मानदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचे ठेचलेले आले मिसळा. पाच ते सात मिनिटे पाणी उकळवून त्यात काळी मिरी घालून चहा बनवा. याचे थोड्या-थोड्या प्रमाणात सेवन करा. यामुळे वेदनांपासून आराम मिळू शकतो.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो : freepik)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”