-
देवगुरु बृहस्पस्ती १२ वर्षांनी मेष राशीत गोचर प्रारंभ करण्यास सज्ज झाले आहेत. २२ एप्रिल २०२३ ला गुरु ग्रह मेष राशीत स्वघरी परतणार आहेत.
-
सकाळी ४ वाजून ४२ मिनिटांनी गुरु ग्रह मीन राशीतून निघून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यानंतर १ मे २०२३ पर्यंत गुरु मेष राशीत असणार आहे.
-
गुरु गोचराचा प्रभाव हा सर्व राशींवर होऊ शकतो. अशातच २२ एप्रिलला गुरु गोचर होऊन ‘विपरीत राजयोग’ तयार होणार आहे.
-
हा राजयोग पाच राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
गुरु गोचर होण्याआधी विपरित राजयोग बनून मिथुन राशीच्या मंडळीसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो.
-
याकाळात आपल्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. धनलाभ होताना तुमचा मान-सन्मान सुद्धा वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीचे योग आहेत.
-
गुरु गोचर झाल्याने महिन्याभरात तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो.
-
तसेच, बेरोजगार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. दुसरीकडे, नोकरी व्यवसायातील लोकांना पदोन्नती किंवा वेतनवाढ मिळू शकते.
-
मेष राशीमध्ये गुरुचे गोचर होताच याचा शुभ प्रभाव कन्या राशीवर होऊ शकतो. याकाळात तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करता येऊ शकते.
-
तुम्हाला वैवाहिक आयुष्यात एक पाऊल पुढे टाकण्याची संधी मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढून मानसिक ताण कमी होऊ शकतो.
-
देवगुरु बृहस्पती गोचर करण्याआधी तूळ राशीच्या मंडळींना प्रचंड लाभ अनुभवता येऊ शकतो. येत्या महिनाभरात आपली अडकलेली कामे मार्गी लागू शकतात.
-
तुमच्या प्रलंबित कामांमधून प्रगतीचे दार उघडू शकते. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी प्रगतीचा योग बनत आहे.
-
गुरु गोचराने तयार होणारा विपरीत राजयोग मीन राशीच्या मंडळींसाठी आनंद आणणार आहे. या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठे फायदे मिळू शकतात.
-
गुरुचे मीन राशीतून मेष राशीत गोचर होताना काही प्रमाणात मीन राशीत काहीसा प्रभाव कायम राहू शकतो. तुम्हाला नियमित कामाशिवाय अन्य माध्यमातून सुद्धा धनलाभ होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित