-
PCOS ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. आजकाल अनेक मुली आणि महिला पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमच्या समस्येने त्रस्त आहेत.
-
या समस्येत महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पीसीओएसच्या समस्येमुळे अनियमित मासिक पाळी, गालांवर मुरुम आणि पोटाच्या खालच्या बाजूची चरबी वाढू शकते.
-
यामुळे प्रजनन समस्या निर्माण होऊ शकतात आणि महिलांना गर्भधारणा होण्यासही त्रास होऊ शकतो. पण आपण आपला आहार आणि काही व्यायाम करून याचा समतोल साधू शकतो. पीसीओएसच्या समस्येपासून काही विशेष व्यायामामुळे आराम मिळू शकतो.
-
1. स्ट्रेंथ ट्रेनिंग – हा व्यायाम केल्याने स्नायू बळकट होण्यासोबतच तणाव दूर होण्यासही मदत होते.
-
दैनंदिन स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यास महिलांना प्रजनन समस्यांपासून आराम मिळू शकतो. मात्र चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-
2. झुंबा – हा व्यायाम खूप मजेदार आहे. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत झुंबा करू शकता.
-
झुंबा व्यायाम केल्याने आपले वजन कमी होऊ शकते, तसेच मासिक पाळीशी संबंधित समस्यांमध्येही खूप मदत होऊ शकते. तंदुरुस्त राहणे गर्भधारणेसाठी मदत करते.
-
3. योगा – जीवनाचा समतोल साधण्यासाठी योगा हे एक चांगले माध्यम असू शकते. पीसीओएसमुळे होणारे हार्मोनल असंतुलनदेखील योगाद्वारे संतुलित राखता येते.
-
योगा केल्याने आपण निरोगी आणि उत्साही राहतो, तसेच यामुळे आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत मिळेल.
-
4. चालणे – जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चालण्याने करत असाल तर तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहाल.
-
चालण्याने रक्तदाब आणि पीसीओएससारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही योग्य राहते.
-
5. पोहणे – पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे कारण यामुळे आपल्या शरीरात रक्ताभिसरण होण्यास मदत होते. (Photos: Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”