-
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध आणि गुरुच्या युतिला अत्यंत शुभ मानले जाते. बुधला तर्कचा कारक ग्रह मानला जातो तर गुरुला ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो.
-
मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बुध आणि गुरू या दोन्ही ग्रहांनी ‘रेवती नक्षत्रा’त एकत्र प्रवेश केलाय. ज्योतिषशास्त्रात बुध आणि गुरूचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो.
-
बुध व गुरूच्या युतीने काही राशींचे नशीब चमकणार असून त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, ‘या’ भाग्यशाली राशी..
-
बुध व गुरुची युती ही वृषभ राशीसाठी लाभदायक व शुभ सिद्ध होऊ शकते. येत्या काळात आपल्या नोकरीत पगारवाढ व पदोन्नतीचे योग आहेत. तुमचे आर्थिक पाठबळ वाढवणाऱ्या काही घटना घडू शकतात.
-
तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. मीडिया, बँकिंग, फिल्म व अभिनयाशी संबंधित करिअरमध्ये असलेल्या मंडळींना अत्यंत लाभाचा काळ अनुभवता येऊ शकतो.
-
बुध व गुरुची युती ही मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकते. तुमच्या राशीला या वर्षाच्या सुरुवातीला शनीच्या साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे त्यामुळे २०२३ हे पूर्ण वर्ष आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते. आपल्याला प्रगतीचे योग आहेत.
-
जमीन आणि वाहन खरेदीचाही योग बनू शकतो. या काळात लोकांना करियरमध्ये नव्या संधी लाभू शकतात. तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी ज्युनिअर व सिनियर्स दोन्ही मंडळींकडून पाठिंबा मिळू शकतो. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीतून अपार धन मिळू शकतो.
-
रेवती नक्षत्रातील बुध व गुरु हे वृश्चिक राशीच्या आयुष्यात प्रगतीचे वाहक ठरू शकतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ असू शकतो. तुम्हाला विवाहाचे योग आहेत. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते.
-
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी बुध आणि गुरुची युति धनलाभ घेऊन येणारी ठरु शकते. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकते.
-
रेवती नक्षत्रातील बुध व गुरु धनु राशीसाठी बदलाचे संकेत घेऊन आले आहेत. तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. हा काळ तुमच्यासाठी फलदायी ठरणारा असू शकतो.
-
नवीन जमीन किंवा वस्तू खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम ठरु शकतो. करियरचा विचार केला तर तुम्हाला नव्या नोकरीच्या संधी मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख