-
ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे परिवर्तन खूप महत्वाचे मानले जाते. ग्रहांच्या राशी बदलामुळे अनेक वेळा राजयोग तयार होतो. काही वेळा ग्रहांच्या संयोगानेही राजयोग तयार होतो.
-
ग्रहांपासून तयार झालेले हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. येत्या काही दिवसात तब्ब्ल ३०० वर्षांनी एक अत्यंत शुभ व अदभूत असा ‘नवपंचम राजयोग’ तयार होत आहे.
-
यावेळी सूर्य, मंगळ आणि गुरु खूप विशेष स्थितीत असून ते मिळून ‘नवपंचम राजयोग’ तयार करत आहेत. ज्योतिषांच्या मते, या तीन ग्रहांमुळे अनेक वर्षांनी या प्रकारचा उत्तम नवपंचम राजयोग तयार होत आहे.
-
या नवपंचम राजयोगामुळे काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
नवपंचम राजयोग तयार होताना मेष राशीच्या गोचर कुंडलीत मन स्थानी शनिदेव आहेत. तर लग्न स्थानी शुक्र व राहू स्थिर आहेत. यामुळे आपल्या कामांसह, वैवाहिक जीवनावर सुद्धा प्रभाव दिसून येऊ शकतो.
-
करिअरच्या दृष्टीने या लोकांना उत्तम लाभ मिळू शकतो. यासोबतच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. उत्पन्नात भर पडण्याची शक्यता असून नवीन काम सुरू करण्यासाठी हा उत्तम काळ ठरु शकतो.
-
नवपंचम राजयोग हा आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत आर्थिक स्थैर्य, कुटुंब व करिअर स्थानी चंद्राचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होईल.
-
या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होत असून पदोन्नतीचेही संकेत आहेत. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची शक्यता असून अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे.
-
कर्क राशीसाठी नवपंचम राजयोगाने आयुष्यात एक नवीन सुरवात करण्याची संधी लाभू शकते. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चंद्र देव हे लग्न स्थानी विराजमान आहेत. यामुळे तुमच्या पदरी मोठे सुख व प्रचंड लाभ पडण्याची शक्यता आहे.
-
तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभाचेही संकेत आहेत. देवगुरु बृहस्पती आपल्या भाग्य स्थानी विराजमान असल्याने आपल्याला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. सूर्य व मंगळासह चंद्र व गुरु युतीने सुद्धा तुम्हाला लाभाची चिन्हे आहेत.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”