-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग जुळून येत असतात.
-
काही वेळा एकाच राशीत काही ग्रह एकत्र आल्यास त्यातून राजयोग निर्माण होऊ शकतात. असाच एक राजयोग काही दिवसातच वृषभ राशीमध्ये तयार होत आहे.
-
आता ५० वर्षांनी राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश घेताच हा ‘महाधन राजयोग’ तयार होणार आहे.
-
हा राजयोग काही राशींसाठी फायदेशीर ठरु शकतो. या काळात लाभ आणि प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.
-
महाधन राजयोग बनल्याने वृषभ राशीतील मंडळीसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत नवव्या व दहाव्या स्थानी तुमच्या राशीचे स्वामी स्थित आहेत. सोबतच शुक्रदेवही लग्नस्थानी स्थित आहेत त्यामुळे काहीच दिवसात मोठे बदल अनुभवण्याची संधी मिळू शकते.
-
तुमच्या राशीच्या कुंडलीत शश, मालव्य व लक्ष्मी राजयोग सुद्धा तयार झाल्याने धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा असू शकते. या काळात तुम्हाला कौटुंबिक सुख प्राप्त होऊ शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते.
-
मकर राशीच्या लोकांसाठी धनराजयोग शुभ सिध्द होऊ शकतो. तुमच्या गोचर कुंडलीत भाग्य गुरु बुधदेव असून ते गोचर कुंडलीत केंद्र स्थानी विराजमान आहेत. यासह शुक्र देव सुद्धा ६ एप्रिलपासून आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत आले आहेत यामुळे तयार होणाऱ्या राजयोगाने तुमचे नशीब कलाटणी घेऊ शकते.
-
शनिदेव तुमच्या राशीच्या धनस्थानी आहेत. शनीचा प्रभाव हा तगडा मानला जातो त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद व त्यात शनीची जोड यामुळे प्रचंड धनलाभ होऊ शकतो. या काळातआर्थिक क्षेत्र मजबूत होऊ शकतो.
-
धन राजयोगाचा कुंभ राशीतील मंडळीसाठी सकारात्मक प्रभाव दिसू शकतो. तुमच्या राशीला भाग्येश स्थानी शुक्र आहे जो तुमच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानी आहे. यानुसार आपल्या राशीत केंद्र त्रिकोण व मालव्य राजयोग सुद्धा तयार होत आहे. येत्या काही काळात आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
-
चांगले भाग्य मिळण्याची सर्व शक्यता आहे. व्यवसायासाठी सहलीला जाऊ शकता. परदेशात शिक्षणाच्या नवीन संधी मिळू शकतात. कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”