-
तुम्ही अनेकदा ट्रेनमधून प्रवास केला असेल आणि सर्वत्र रेल्वे रुळांचे जाळे असल्याचे तुम्ही पाहिले असेल.
-
अनेक ट्रॅक एकमेकांना ओलांडत राहतात आणि ट्रेन त्यानुसार मार्ग काढते.
-
ट्रेन ज्या रूटने जाते ट्रॅक त्याच हिशेबाने अॅडजस्ट केलेले असतात. या ट्रॅकमध्ये एक खासप्रकारचा ट्रॅक असतो. ज्याला ‘डायमंड रेल्वे क्रॉसिंग’ म्हणतात.
-
डायमंड क्रॉसिंग हा एक विशेष प्रकारचा क्रॉसिंग आहे. असा रुळ फक्त विशेष परिस्थितीमध्येच तयार केला जातो.
-
या ठिकाणी चारही दिशांनी गाड्या येतात. त्यामुळे येथे एकाच ठिकाणी चार रेल्वे रुळ ओलांडत आहेत. यामुळे येथे हिऱ्याचा आकार तयार होतो, म्हणून या क्रॉसिंगचे नाव ‘डायमंड क्रॉसिंग’ आहे.
-
चारही दिशांनी रेल्वे रुळ क्रॉस करतात. हे भारतात फक्त एकाच ठिकाणी आहे.
-
डायमंड क्रॉसिंग महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. हे डायमंड क्रॉसिंग नागपुरातील संप्रीती नगरमधील मोहन नगरमध्ये आहे.
-
इथे कोणालाही जास्त वेळ उभ राहण्याची परवानगी नसते. देश-विदेशातून अनेकजण डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी या जागेला भेट देतात.
-
चार दिशांमधून येणाऱ्या या रुळांवर वेगवेगळ्या रेल्वेचे मार्ग आहेत. पूर्वेकडील गोंदियाकडून येणारा ट्रॅक हावडा-रौरकेला-रायपूर मार्ग आहे. येथे एक ट्रॅक दक्षिण भारतातून येतो.
-
एक ट्रॅक दिल्लीकडून येतो, जो उत्तरेकडून येतो. या ठिकाणी पश्चिम मुंबईकडूनही एक ट्रॅक येत आहे. अशाप्रकारे चारही दिशांचे ट्रॅक इथे एकाच ठिकाणी मिळतात.
-
एकाच वेळी दोन गाड्यांना हा ट्रॅक ओलांडणे शक्य नसल्याने चारही दिशांनी येणाऱ्या गाड्यांच्या वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.
-
या जागेवर एकावेळी ट्रेन येऊन अपघात होणार नाही, याची काळजी रेल्वे यंत्रणेकडून घेतली जाते. (फोटो:संग्रहित छायाचित्र)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा