-
अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते.
-
या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात.
-
मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत.
-
प्रवासावेळी तुम्हाला उलटी येऊ नये, यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. या सोप्या टिप्स फॉलो करा. तुमचा प्रवास होईल आनंदात..
-
जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.
-
अन्न काळजीपूर्वक निवडा. तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
-
कारमध्ये उलट्यांचा धोका कमी करण्यासाठी जेवणासोबत पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.
-
बाजारात अशी अनेक औषधे आहेत, जी तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी घेऊ शकता. याची काही उदाहरणे Vomikind आणि ondem md 4 आहेत. तथापि, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.
-
कारमधून प्रवास करताना मोबाईल फोन वापरणे टाळा. मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.
-
जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.
-
कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या.
-
(टीप: वरिल माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.) (फोटो सौजन्य-freepik )

Horoscope Today: संकष्टी चतुर्थीला बाप्पा मेष ते मीनची कोणती इच्छा पूर्ण करणार? तुम्हाला फायदा होईल की नुकसान? वाचा राशिभविष्य