-
ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात धनदाता आणि राक्षसांचा गुरु असलेला शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह धन, संपत्ती, प्रेमाचा कारक ग्रह आहे.
-
२ मे ला दुपारी १ वाजून ४६ मिनिटांनी शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश होणार आहे. ज्योतिष अभ्यासक सांगतात की, मिथुन राशीत अगोदरच मंगळदेव स्थिर आहेत त्यामुळे शुक्र व मंगळाची युती होईल.
-
मंगळ आणि शुक्राची युती मिथुन राशीत आठ दिवस राहील. मंगळ ग्रहाला आत्मविश्वास आणि साहसाचं प्रतिनिधित्व मानलं गेलं आहे. तर शुक्र ग्रहाला आत्मसन्मान, धनवैभव यांचा कारक मानलं गेलं आहे.
-
शुक्र व मंगळाची युती होऊन येत्या काळात काही राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.
-
मेष राशीत शुक्र व मंगळाचे गोचर हे तिसऱ्याच स्थानी होणार आहे. येत्या काळात या राशींच्या लोकांना कौटुंबिक सुख अनुभवता येऊ शकतो. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
-
येत्या काळात मान-सन्मान वाढू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे कौतुकही मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. या काळात राशीला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
-
शुक्र व मंगळाचे गोचर हे वृषभ राशीच्या दुसऱ्या स्थानी होत आहे. या राशीला येत्या काळात प्रचंड धन, संपत्ती, आनंद, समृद्धी अनुभवता येऊ शकते. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळू शकतो.
-
या काळात नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल दिसून येऊ शकतात. व्यवसायातही विस्तार होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी अधिक नफा होऊ शकतो, तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.
-
कन्या राशीच्या कुंडलीत मंगळ देव आठव्या स्थानी व शुक्र दहाव्या स्थानी स्थिर होणार आहे. कन्या राशीच्या नोकरदार व व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अनपेक्षित स्वरूपात माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभू शकतो.
-
अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना या काळात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”