-
अलिकडच्या काळात लोकांना आपल्या आरोग्याचे आणि नैसर्गिक घटकांचे महत्त्व प्रारक्षणे जाणवत आहे. अशातच लोक पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करू लागले आहेत. (Freepik)
-
आहार तज्ज्ञ गरिमा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार तांबे हे पोटाच्या आरोग्यसाठी गुणकारी असते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पचनप्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. (Freepik)
-
त्यात एक आवश्यक खनिज असते जे लाल रक्तपेशींचे उत्पादन, हाडांची देखभाल आणि संयोजी ऊतकांच्या निर्मितीसह विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. (Unsplash)
-
हे कोलेजन तयार करण्यात देखील मदत करते आणि मज्जातंतू पेशी तसेच रोगप्रतिकार प्रणाली निरोगी ठेवते. पण तुम्हाला माहिती आहे का, तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी प्यायल्याने शारीरिक नुकसान होऊ शकते. (Freepik)
-
असे म्हटले जात आहे की तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेल्या पाण्याचे जास्त सेवन विषारी असू शकते आणि आपल्या शरीराच्या काही अवयवांना यामुळे नुकसान पोहोचू शकते. (Freepik)
-
तांब्याच्या बाटलीतून साठवलेले पाणी रोज प्यायल्याने कोणकोणते नुकसान होऊ शकते, जाणून घेऊया. (Unsplash)
-
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ऑफ डायटरी सप्लिमेंट्सच्या मते, तांब्याच्या बाटलीत साठवलेले पाणी मर्यादित प्रमाणात पिणे फायदेशीर आहे. परंतु यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात विषारी घटक वाढू शकतात आणि यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकते. (Pexels)
-
असेही म्हटले जाते की, तांब्याच्या बाटलीमध्ये पाणी साठवून ठेवल्यास बाटलीला गंज येतो आणि असे पाणी प्यायल्याने आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. (Pixabay)
-
तांब्याच्या बाटलीतील पाणी जास्त प्यायल्याने मळमळ, उलट्या आणि जुलाब यांसारख्या समस्या वाढू शकतात. ही शरीरात विषबाधा झाल्याची लक्षणे आहेत. यावर उपचार न केल्यास यकृत आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. (Pixabay)
-
जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यातून नियमितपणे पाणी पितो तेव्हा तांब्याच्या भांड्यातील क्रिस्टल रक्तात मिसळू लागतात आणि किडनी आणि यकृताला नुकसान होते. (Pixabay)
-
तसेच, यामुळे श्वास घेताना नाकात आणि घशात जळजळ होऊ शकते. इतकेच नाही, तर चक्कर येणे आणि डोकेदुखी यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. (Pixabay)
-
तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेल्या पाण्यातून होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी, याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. तांब्याच्या बाटलीतील पाण्याचे दिवसातून केवळ 2 ते 3 वेळाच सेवन करावे. (Pixabay)
-
दिवसभर केवळ तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्याचे सेवन करू नये, यामुळे शारीरिक नुकसान होऊ शकते. असेही सुचवले जाते की रात्री तांब्याच्या भांड्यात 6 ते 8 तास साठवलेले पाणी सकाळी उठून प्यावे. (Freepik)

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक