-
आशियातली सर्वात मोठी आणि जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं.
-
तुम्ही पाहिलं असेल की रेल्वेमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात. यामध्ये एसी कोच, स्लीपर कोच आणि जनरल कोचचा समावेश आहे.
-
प्रवास करताना या रेल्वेच्या कोचचे रंग वेगवेगळे असल्याचं पाहायला मिळतं. कधी विचार केलाय की, प्रत्येक डब्याचा रंग असा वेगवेगळा का असतो?
-
भारतीय रेल्वेत सर्वाधिक निळे डब्बे दिसून येतात. या डब्ब्यांना इंटिग्रल कोच असे म्हणतात. हे डब्बे एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनला जोडण्यात येतात. हे लोखंडाने बनविण्यात येतात.
-
इंटिग्रल कोच फॅक्टरी तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे आहे. भारतीय रेल्वेमध्ये जनरल, एसी, स्लीपर, डेमु, मेमू या प्रकारचे कोच असतात. यासाठी बहुतांश वेळा निळ्या रंगांचा वापर केला जातो.
-
हिरव्या रंगाचे डबे गरीबरथमध्ये वापरण्यात येतात. तर तपकिरी रंगांचे डबे मीटरगेज गाडयांमध्ये वापरण्यात येतात.
-
काही रेल्वे झोनकडुन त्यांच्या झोनमधील ट्रेनसाठी रंगांची निवड केली आहे. त्यानुसार वेगळे रंग पाहायला मिळतात. रेल्वेत विविधता यावी, यासाठी रेल्वेने हे रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
-
विशेष प्रकारच्या डब्ब्यांसाठी लाल रंगाचा वापर केला जातो. लाल रंगांचे हे डब्बे २००० साली जर्मनीतून भारतात आणण्यात आले. या प्रकारच्या डब्ब्यांना ‘लिंक हॉफमेन बुश’ (LHB) म्हटले जाते.
-
हे डबे ॲल्युमिनियमचे बनलेले असून इतर डब्यांच्या तुलनेत याचे वजन कमी असते. त्यामुळे यांचा वेग जास्त असतो. या प्रकारचे डबे असणाऱ्या गाड्यांचा वेग १६० किमी ते २०० किमी प्रतितास असतो.
-
भारतीय रेल्वेने LHB राजधानी एक्सप्रेस, LHB शताब्दी एक्सप्रेस, LHB तेजस एक्सप्रेस, LHB डबल डेकर, LHB हमसफर आणि LHB गतिमान यांचा समावेश असलेल्या अनेक गाड्यांसाठी विविध LHB कोच सुरू केले आहेत.
-
ट्रेनममधून प्रवास करणे सोयीचे असल्याने आजही देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेनेच प्रवास करतात. तसेच बस आणि विमानापेक्षा रेल्वेप्रवास स्वस्त देखील आहे.
-
(फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच