-
Jupiter Rise 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. त्याचप्रमाणे उदय व अस्त होत असतो.
-
जेव्हा एखाद्या ग्रहाचा अस्त होतो तेव्हा शक्यतो शुभ कार्य टाळली जातात तर ग्रह उदय स्थितीत असल्यास शुभ कार्यांना सुरुवात होत असते.
-
गुरु उदयासह हंस पंचराजयोग सुद्धा तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते.
-
१२ राशींवर या ग्रहस्थितीचा परिणाम होत असतो. देवगुरु बृहस्पति हे अलीकडेच मेष राशीत उदित झाले आहेत
-
हंस राजयोगाचा प्रभाव मुख्यत्वे तीन राशींवर दिसून येणार आहे. या तीन राशींना प्रचंड धनलाभासह एक वेगळा अनुभव येऊ शकतो.
-
हंस राजयोगाने सर्वाधिक फायदा हा कर्क राशीला होण्याची चिन्हे आहेत. या राशीच्या नोकरदार मंडळींना प्रगतीची चिन्हे आहेत, येत्या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो
-
धनु राशीसाठी हंस राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. धनु राशीला भावंडे व आई वडिलांच्या रूपात धन प्राप्तीचे मोठे संकेत आहेत. पैसे व नाती यांच्यात द्विधा मनस्थिती होऊ शकते
-
मीन राशीच्या मंडळींना हंस राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याचा कालावधी आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. कामाच्या ठिकाणी आळसावर मात करणे गरजेचे आहे.
-
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”