-
‘डायबेटिक न्यूरोपॅथी’ संपूर्ण शरीरातील नसांवर परिणाम करते. यामुळे संपूर्ण शरीरात संवेदना निर्माण होते. सहसा, डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये, हात आणि पायांच्या नसा बाधित होतात.
-
डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये खूप वेदना होतात. त्यामुळे पचनशक्तीवरही परिणाम होतो. याबरोबरच लघवीला त्रास होतो आणि रक्तवाहिन्या आणि हृदयावर परिणाम होतो.
-
संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्णांना डायबेटिक न्यूरोपॅथीचा सामना करावा लागतो. पण रक्तातील साखरेची होणारी वाढ नियंत्रणात ठेवली तर हा आजार होण्याची वेळ येणार नाही.
-
या प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीरातील नसांना इजा होण्यापूर्वीच त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. नसा खराब होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करायला हवा, ते जाणून घेऊया.
-
मायो क्लिनिकच्या मते, डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये मज्जातंतूंना इजा होण्यापूर्वी काही गंभीर चिन्हे दिसू शकतात. सर्वप्रथम हे हात आणि पायांच्या नसांमध्ये दिसून येते आणि बोटांमध्ये संवेदना होतात.
-
यामध्ये हातपाय थरथरणे, जळजळ होणे आणि वेदना यांचा समावेश असतो. यानंतर हे अवयव सुन्न होऊ लागतात. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते तेव्हा रक्तवाहिन्यांची भिंत कमकुवत होऊ लागते. त्यामुळेच नसा फुटण्याचीही भीती निर्माण होते. त्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहते.
-
डायबेटिक न्यूरोपॅथीची लक्षणे आणि यापासून बचावाच्या पद्धती जाणून घ्या.
-
नितंब आणि मांडीमध्ये तीव्र वेदना, तसेच मांडीच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणा. उठताना आणि बसताना त्रास होणे.
-
अवयव सुन्न होणे, वेदना आणि तापमानातील बदल न जाणवणे. तसेच हातापायाला मुंग्या येणे.
-
त्वचा अतिशय संवेदनशील होणे. पायाच्या गंभीर समस्या, जसे की अल्सर, संक्रमण तसेच हाडे आणि सांध्याचे नुकसान
-
काही व्यक्तींना अर्धांगवायू (पॅरालिसीस)देखील होऊ शकतो.
-
डायबेटिक न्यूरोपॅथीवर ताबडतोब नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे एकत्र दिसली तर डायबेटिक न्यूरोपॅथीची ताबडतोब चाचणी करून घ्यावी, अन्यथा नसा खराब होऊ शकतात.
-
औषध घेत रहावीत. शारीरिक हालचाल आवश्यक आहे. निरोगी आणि योग्य आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्या. तसेच, चिंतामुक्त राहण्याच प्रयत्न करना. तणावामुळे आजार आणखी वाढू शकतो. (Photos: Freepik)

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू