-
ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचे संक्रमण ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. कारण त्याचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडत असतो.
-
काही दिवसांनी जून महिना सुरू होईल. ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने हा महिना खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात अनेक ग्रह राशी बदलणार आहेत.
-
त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. आज आपण जाणून घेऊया की पुढील महिन्यात कोणते ग्रह राशी बदलतील आणि त्यामुळे कोणत्या राशींचे दिवस बदलणार आहेत.
-
७ जून २०२३ रोजी बुध ग्रह सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ही शुक्राची राशी असून अनेक राशींना या संक्रमणाचा लाभ मिळू शकतो.
-
२४ जून रोजी बुध मिथुन राशीत जाईल. येथे तो ८ जुलै २०२३ पर्यंत राहणार आहे.
-
ग्रहांचा राजा सूर्यदेखील जून महिन्यात वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल. १५ जून २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांनी तो या राशीत प्रवेश करेल.
-
१६ जुलै २०२३ रोजी सकाळी ४.५९ पर्यंत सूर्यदेव या राशीत राहतील. यानंतर ते कर्क राशीत संक्रमण करतील. सूर्याच्या संक्रमणामुळे अनेक राशींना धन आणि सन्मान मिळण्याची संभावना आहे.
-
ज्योतिष शास्त्रानुसार सध्या शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत विराजमान आहेत. १७ जून रोजी रात्री १० वाजून ४८ मिनिटांनी शनिदेव कुंभ राशीमध्ये, प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करतील.
-
अशा परिस्थितीत अनेक राशींच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. यानंतर, शनि ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.२६ पर्यंत त्याच रक्षित प्रतिगामी राहतील आणि नंतर मार्गी होतील.
-
गणित, तर्क आणि बुद्धीचा ग्रह मानला जाणारा बुध १९ जून रोजी सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी वृषभ राशीत अस्त होणार आहे. त्याचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल.
-
जून महिन्यात सूर्य आणि बुध ग्रहाच्या राशीत बदल घडतील. याशिवाय शनि वक्री होऊन बुध अस्ताला जाईल. त्यामुळे कन्या, मेष, मिथुन, मकर आणि तूळ राशीच्या लोकांना जून महिन्यात विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींवर आनंदाचा वर्षाव होण्याची संभावना असून व्यवसाय आणि नोकरीतही लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन आनंदाने भरले जाऊ शकते आणि दीर्घकाळ प्रलंबित कामेही पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Pexels)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”