-
गेल्या काही वर्षांमध्ये भारतात करोडपती कुटुंबांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळतेय.
-
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी करोडपतींच्या श्रेणीत येणाऱ्या लोकांच्या संख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
-
आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या अहवालानुसार, मुंबईत सर्वाधिक २०,३०० डॉलर करोडपती आहेत.
-
यानंतर १७,४०० करोडपती कुटुंबे दिल्लीत तर १०,५०० कुटुंब कोलकत्यात राहतात.
-
अँटिलिया ही भारतातील सर्वात महाग प्रॉपर्टी आहे. ज्यामध्ये २७ मजल्यांचा समावेश आहे
-
मुंबईत शाहरुख खानच्या बंगल्याची प्रचंड चर्चा आहे. अहवालानुसार, या ६ मजली उंच इमारतीची किंमत सुमारे २०० कोटी रुपये आहे.
-
नवीन जिंदल यांचे घर लुटियन्स बंगला नवी दिल्लीतील सर्वात महागड्या आलिशान घरांपैकी एक आहे.
-
रवी रुईया आणि शशी रुईया यांचे हे घर दिल्लीत आहे. हा भव्य बंगला एस्सार ग्रुपचे मालक आणि बिझनेस टाइकून रुईया बंधूंचा आहे. हा सुंदर बंगला २.२४ एकरमध्ये पसरलेला आहे.
-
टाटा समूहाचे मालक रतन टाटा यांचे घरही अतिशय आलिशान आहे. मुंबईतील कुलाबा येथे असलेल्या या घराची किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे. (Photos-pixabay\financialexpress)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका