-
रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात.
-
भारतीय रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नसते. यात काही रेल्वेचे नियम देखील आपल्याला माहित नसतात.
-
तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचा हा नियम माहीत असणं गरजेचं आहे.
-
एवढे मोठे नेटवर्क सुरळीत चालण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. जसे तुम्ही ज्या डब्याचे तिकीट घेतले आहे त्याच डब्यातून प्रवास करावा.
-
पण तुम्हाला माहित आहे का की, ट्रेनमध्ये असा एक डब्बा असतो, ज्यामध्ये चुकूनही तुम्ही चढलात तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
-
रेल्वेचा हा नियम फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया रेल्वेच्या कोणत्या डब्यात चढल्यास तुरुंगवास किंवा तुम्हाला दंडही होऊ शकतो…
-
ट्रेनचा प्रवास खूप आरामदायी असतो हे सर्वांनाच माहीत आहे. ट्रेनमध्ये जनरल, स्लीपर आणि एसी श्रेणीचे डबे दिसतात.
-
याशिवाय रेल्वेमध्ये एक डबा असाही आहे, ज्यामध्ये प्रवास करणे कोणालाही महागात पडू शकते.
-
खरं तर, आम्ही पॅन्ट्री कारबद्दल बोलत आहोत. रेल्वेच्या पॅन्ट्री कार डब्यातून कोणी प्रवास करताना आढळल्यास त्याला तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो.
-
रेल्वेच्या नियमानुसार कोणताही प्रवासी रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये प्रवास करू शकत नाही.
-
कोणी प्रवासी असे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते.
-
तथापि, गरम दूध किंवा पाणी इत्यादीसारख्या विशेष ऑर्डरसाठी, तुम्ही पॅन्ट्री कारमध्ये जाऊ शकता. पण त्यात प्रवास करण्याची अजिबात परवानगी नाही. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य