-
फॅशन आयकॉन असलेल्या शिल्पा शेट्टीने आज वयाच्या ४८ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. शिल्पा शेट्टीचे सगळेच आऊटफिट जगभरातील फॅशन क्षेत्रातील कलाकारांना प्रभावित करत असतात. तिने अलिकडेच परिधान केलेल्या काही कपड्यांबद्दल आपण आज जाणून घेऊयात. शिल्पाने नुकतेच मेटॅलिक कट आऊट लाँग गाऊन परिधान केला होता. हातात सिल्वर रंगाचा क्लच आणि मोजक्या ज्वेलरीमुळे नेटिझन्सचे लक्ष तिच्या पोस्टवर खिळले होते. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम) -
तिच्या पहिल्या लूकपेक्षा हा लूक एकमद वेगळा आहे. फॅशनच्या बाबतीत शेट्टी अत्यंत अष्टपैलु आहे. कोणत्याही प्रकारचे कपडे ती अगदी सहज कॅरी करते. या फोटोमध्येही तिने काळ्या आणि सोनेरी लेपर्ड प्रिंट पँटसूटमध्ये घातली असून ती यात लेडी बॉससारखी दिसतेय. शिवाय, कमीत कमी दागिने, बांधलेले केस आणि तिने पकडलेली मॅचिंग प्रिंटेड पर्स तिच्या संपूर्ण लुकला लोभस बनवत आहे. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
एचटी इंडियाज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2023 मध्ये, शेट्टीने ब्लॅक अँड व्हाईट थीमनुसार कपडे परिधान केले होते. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
शिल्पा शेट्टीचा हा लूक अगदी जलपरीसारखा दिसत आहे. फ्लोइंग स्कर्टमध्ये ती तितकीच हॉट दिसतेय. पांढर्या शीअर टॉपच्या खाली दिसणारा निळ्या ब्रॅलेटमुळे आऊटफिटला चारचांद लागले आहेत. संपूर्ण निळ्याशार रंगात रंगलेल्या शिल्पाने हिल्स मात्र गुलाबी रंगाचे घातले आहेत. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
प्रत्येक भारतीय स्त्री साडीमध्ये जरा जास्तच खुलून दिसते. शिल्पाने परिधान केलेल्या फिकट लाल साडीमध्ये ती उठावदार दिसतेय. या फॅन्सी साडी कम लाँग गाऊनवर तिने चमचमता हार परिधान केल्याने ती अधिक सुंदर दिसते आहे. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
हा पांढरा निळा ऑफ-शोल्डर बेल्टच्या ड्रेसमध्ये शिल्पा अधिक खुलून दिसतेय. चमकदार पांढरे स्टिलेटोस आणि हातातील कड्यामुळे तिला ग्लॅमर लूक मिळाला आहे. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
लाँग कर्ट गोल्डन स्कर्टमध्ये शिल्पा अधिक ग्लॅमर दिसतेय. काळ्या रंगाचे हाय हिल्स, काळ्या रंगाचे शर्ट आणि सोनेरी रंगाचे दागिने या कॉम्बिनेशनवरून तिचा उत्तम फॅशन सेन्स दिसून येतो. तिची देहबोली जलपरीप्रमाणे असल्याने बॉडी फिट स्कर्ट तिला अधिक उठून दिसतात. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
लाल रंगाच्या साडीवर फुलांची सुंदर आरास करण्यात आळी आहे. टॉपसारख्या ब्लाऊजमुळे तिच्या साडीला एक वेगळाच लूक प्राप्त झाला. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
-
साडीप्रिय असलेल्या कोणत्याही महिलेला शिल्पाचा हा लूक आवडल्याशिवाय राहणारच नाही. पांढऱ्या रंगात सजलेल्या शिल्पाने यावर मेटलिक ज्वेलरीचा वापर केला आहे.. (स्रोत: शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा