-
दिशा पटानी आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. हा अभिनेत्री केवळ एक हार्डकोर फिटनेस प्रेमी नाही तर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठीही ती ओळखली जाते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या नव्या लुकसाठी उत्सूक असतात. तिच्या वाढदिवसानिमित्त बी-टाउन दिवाचे आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चेत राहिलेले लूक आपण पाहुयात.
एक व्हिलन रिटर्न्स फेम अभिनेत्री मेटॅलिक गाऊनमध्ये सुंदर दिसतेय. तिने मॅचिंग स्ट्रॅपी हील्स आणि नाजूक नेकलेससही परिधान केा आहे. स्मोकी डोळे, हायलाइटर आणि न्यूड शेड लिपस्टिकमुळे ती अधिक खुलून दिसतेय. (स्रोत: दिशा पटानी/इन्स्टाग्राम) -
दिशाने फिगर हगिंग लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. सेमी शिर फॅब्रिकमध्ये हा गाऊन असून ती यामध्ये अधिक आकर्षक दिसतेय.(स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
लोकरीचा वापर करून तिने उत्तम आऊटफिट तयार केलं आहे. त्यावर तिने ट्रेंडी ज्वेलरी परिधान केली असल्याने तिचा हा लुक खास ठरला आहे. (स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
दिशाने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिने सिल्व्हर पर्स आणि काळ्या हिल्ससह भन्नाट लुक ऍक्सेसरीझ केला आहे. गदड लाल रंगाची लिपस्टिक आणि मोकळे केस यामुळे ती नाजूक बाहुलीसारखी दिसतेय.(स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
क्रॉपटॉप, चमकदार मिडी स्कर्टमध्ये ती खुलून दिसतेय. अॅक्सेसरीजसाठी तिने हूप इअरिंग्ज आणि सिल्व्हर हील्सची निवड केली. तिने तिचे केस वेव्ही फॅशनमध्ये स्टाइल केले आणि मेकअपसाठी न्यूड टोन निवडला आहे.(स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
गुलाबी रंगाच्या लेहेंगा सेटमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच सुंदर दिसतेय.यामध्ये लेस ऍप्लिक आणि भरतकाम असलेला ब्लाउज आणि घेरवाला लेहेंगाचा समावेश आहे. (स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
दिशा अप्सरा शैलीच्या पोशाखात शाही दिसतेय. यामध्ये लांब स्कर्टसह सिक्विन ब्लाउजचं तिने कॉम्बिनेशन केलं आहे.(स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
अत्यंत साध्या लूकमध्येही ती आकर्षक दिसेतय. तिनेह यामध्ये काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला असून डेनिम जीन्स परिधान केली आहे. यासाठी तिने ग्लॉसी मेकअप केला आहे. (स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)
-
तपकिरी रंगाच्या या वनपिसमध्ये दिशा हॉट दिसतेय. या वनपीसवर तिने फक्त गळ्यात नाजूक चेन घातली आहे. (स्रोत: दिशा पटानी/ इंस्टाग्राम)

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral