-
ऋषी समुद्र यांनी लिहिलेल्या सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या ठेवणीवरून माणसाचा स्वभाव व गुण ओळखता येतात असे मानले जाते.
-
सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या हाताच्या बोटांची ठेवण तुमच्या व्यक्तिमत्व व भविष्याविषयी सुद्धा भाष्य करत असते.
-
असं म्हणतात हाताची पाचही बोटं सारखी नसतात, यानुसार तुमच्या प्रत्येक बोटाच्या लांबी व आकारावरून काही खास गुपितं उघड होतात ती कोणती हे पाहूया…
-
करंगळी: सामुद्रिक शास्त्रानुसार करंगळी व्यक्तीच्या कौटुंबिक व आर्थिक भाग्याविषयी सांगत असते. करंगळी जितकी लांब तितक्या तीक्ष्ण बुद्धीची व्यक्ती असा समज आहे. अशा व्यक्ती तर्कशुद्ध व दुरदृष्टीने विचार करणाऱ्या असतात म्हणूनच समाजात त्यांना ज्ञानी अशी ओळख असते.
-
अनामिका: भावना, आरोग्य व यशाची संधी याविषयी अनामिका भाष्य करते. हे बोट अधिक लांब असणाऱ्या व्यक्ती हट्टी व रागीट मानल्या जातात तर मध्यम लांबी असल्यास शुभ मानले जाते. या लोकांना नशिबाचे पाठबळ असते.
-
तर्जनी: करिअरमधील प्रगतीचे संकेत देणारी तर्जनी ही लांब व सरळ असणे शुभ मानले जाते तर अनामिकेच्या लांबीची असणे अशुभ मानले जाते. तर्जनी शुभ संकेत देत असल्यास या व्यक्ती चैनीचे आयुष्य जगू शकतात असे मानले जातात. यांच्या कुंडलीत राजयोग असतो.
-
मध्यमा: मध्यमा सर्वच बोटांचे संकेत एकत्रित देत असते. त्यामुळे हे बोट लांब असल्यास अधिक शुभ मानले जाते. अशा व्यक्ती लोकप्रियता अनुभवू शकतात तसेच त्यांचे निर्णय हे इतरांना प्रेरणा देणारे असतात
-
अंगठा: ज्या लोकांचा अंगठा लहान आणि जाड असल्यास आत्मविश्वासाची कमतरता व अंगठा बारीक आणि लांब असल्यास धैर्यवान व्यक्ती अशी ओळख मानली जाते. अंगठा खूप मागे वळला असेल तर दयाळू व अंगठ्याचा मधला भाग जाड वरचा आणि खालचा भाग पातळ असल्यास खूप आनंदी आयुष्य जगता येते
-
(टीप: वरील माहिती ही सामान्य ज्ञान व गृहीतके यांवर आधारित आहे)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”