-
मधुमेह हा असा आजार आहे जो झाल्याचे रुग्णाला समजतही नाही. हा आजार होण्यामागे बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि वाढलेला ताण इत्यादी गोष्टी कारणीभूत ठरतात.
-
मधुमेह हा एका रात्रीत होणारा आजार नाही. आपल्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार जास्त बाळवतो. मधुमेहाचा आजार इतक्या झपाट्याने पसरत आहे की आजकाल लहान मुलेही या आजाराला बळी पडत आहेत.
-
मधुमेहाचा आजार होण्यापूर्वी प्रीडायबेटिजची स्थिती येते. आपला आहार आणि जीवनशैलीत एकाच वेळी चांगले बदल केले तर तर आपण रक्तातील वाढणारी साखर सहन नियंत्रणात आणू शकतो.
-
गरजेपेक्षा जास्त तहान, जास्त भूक, कोरडे तोंड, जखम भरण्यास वेळ लागणे आणि वारंवार लघवीला होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.
-
ही सर्व लक्षणे प्री-डायबेटिज आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमालीचे वाढल्यासही दिसून येतात. म्हणूनच प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने ही लक्षणे ओळखणे आणि रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत राहणे आवश्यक आहे.
-
निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची सामान्य पातळी 90 ते 100 mg/dL दरम्यान असते. जर एखाद्याने निरोगी आहार आणि जीवनशैलीचे पालन केले तर साखरेची सामान्य पातळी राखणे सहज शक्य आहे.
-
जर साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवले नाही तर हृदयविकार, किडनी, फुफ्फुस आणि डोळे यांचे नुकसान होऊ शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त किंवा कमी होणे हे आरोग्य बिघडल्याचे लक्षण आहे.
-
प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या वयानुसार रक्तातील साखरेचे व्यवस्थापन केले पाहिजे. आज आपण जाणून घेऊया वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी.
-
६ ते १२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ८० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl असायला हवे.
-
१३ ते १९ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ७० ते १५० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
२० ते २६ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
२७ ते ३२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
३३ ते ४० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १४० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
५० ते ६० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १४० ते १५० mg/dl असायला हवे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात