-
सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
-
परंतु, या घटकाविषयी दाम्पत्यांमध्ये अनेक समज-गैरसमज किंवा प्रश्न असतात. या प्रश्नाचं वेळीच निराकरण झालं तर लैंगिक जीवन अधिक आरोग्यदायी होतं आणि मातृत्वाचा हेतूही सफल होतो.
-
आजही समाजात संबंध आणि मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही.
-
महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबत सर्वात सामान्य असलेला गैरसमज हा आहे की, मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होत नाही.
-
मासिक पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता कमी राहते किंवा अजिबात राहत नाही किंवा शक्य नाही, असं मुळीच नाही.
-
मासिक पाळीवेळी अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होऊ शकते.
-
तज्ज्ञांच्या मते, स्त्रीची प्रजनन क्षमता ओव्हुलेशन (Ovulation) दरम्यान सर्वाधिक असते. ओव्हुलेशनवर अनेक गोष्टी प्रभाव टाकू शकतात.
-
महिलांच्या अंडाशयातून बीजनिर्मिती आणि प्रसारण होण्याला ‘ओव्ह्युलेशन’ म्हणतात.
-
स्त्रियांच्या शरीरातलं बीज (Eggs) आणि पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंचा (Sperm) संयोग झाल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
-
२८ दिवसांच्या मासिक पाळीच्या चक्रात ओव्हुलेशन साधारणपणे १४ व्या दिवसाच्या वेळी सुरु होऊ शकते.
-
मासिक पाळी संपण्याच्या दिवसात प्रोटेक्शन न वापरता शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक राहते.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा) (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल