-
तूप हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्न आहे. त्यातील विविध घटक शरीरासाठी उपयुक्त आहेत.
-
तज्ज्ञांच्या मते, आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या तुपाचे सेवन केल्याने काही लोकांच्या आरोग्यालाही हानी पोहोचते.
-
आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही लोकांना तुपाचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून वारंवार दिला जातो.
-
चला चर जाणून घेऊया तज्ज्ञ काय सांगतात, तूप कोणी खाऊ नये…
-
ज्या लोकांना यकृताची समस्या आहे त्यांच्यासाठी तुपाचे सेवन विषासारखे काम करते. लीव्हरचा आजार असल्यास त्याची क्षमता कमी होते आणि पचनावर परिणाम होतो.
-
ताप असताना तूप न खाणे चांगले. विशेषत: ऋतू बदलत असताना ताप येतो. अशा वेळी तूप खाल्ल्याने छातीत कफ होते आणि खोकला येतो. त्यामुळे तूप खाणं टाळा.
-
गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन झपाट्याने वाढते. परिणामी तुपाचे सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.
-
पचनाशी निगडीत किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तूप खाणे टाळावे. फॅटी ऍसिडस् युक्त तुपाचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो.
-
डिस्लिपिडेमिया, फॅटी लिव्हर, हृदयविकार असलेल्या लोकांनी आणि पित्त मूत्राशय काढण्याची शस्त्रक्रिया केलेल्या लोकांनी तूप टाळावे.
-
तज्ज्ञांच्या मते ज्यांचा बीएमआय जास्त आहे त्यांनी तूप खाणे टाळावे.
-
(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे. तूप कोणी खावे आणि कोणी खाऊ नये, याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
-
(फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल