-
घशाचा कर्करोग होण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान कारणीभूत असतं, असं आजपर्यंत आपल्याला कानावर ऐकू आलयं.
-
पण आता नुकतीच एका संशोधनातून विचित्र बाब समोर आली आहे.
-
तोंडावाटे केलेला सेक्स आणि घशाचा कर्करोग होण्याचा स्पष्ट असा संबंध असल्याचं, या संशोधनात सांगण्यात आलंय.
-
ओरल सेक्स आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. ओरल सेक्स करताना लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
-
यूके आणि यूएसमधील एका अभ्यासात असुरक्षित ओरल सेक्स हा घशाच्या कर्करोगासाठी धोकादायक ठरत असल्याचा दावा करण्यात आलायं.
-
ओरल सेक्समुळे घशाच्या मागच्या बाजूला कॅन्सर होऊ शकतो. या प्रकारच्या कॅन्सरला ओरोफॅरेजियल कॅन्सर (oropharyngeal Cancer) असं म्हणतात. अन्प्रोटेक्टेट ओरल सेक्समुळे हा त्रास होऊ शकतो.
-
संशोधनानुसार,ओरल सेक्समुळे थेट घशाचा कॅन्सर होत नाही, पण तो Human Papillomavirus (HPV) पसरवू शकतो.
-
एचपीव्हीमुळे पेशींमध्ये कॅन्सररोगापूर्वीचे बदल होऊ शकतात, ज्यामुळे नंतर घशाचा कॅन्सर होऊ शकतो.
-
अलिकडच्या वर्षांत HPV विषाणूमुळे घशाच्या कर्करोगाच्या संख्येत वाढ झाली आहे. घशाचा कर्करोग तोंडावाटे संभोगातून प्रसारित होतो.
-
कित्येक लैंगिक आजारांचा प्रार्दुभाव होण्यामागे बहुतांश वेळा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. या व्हायरसमुळे घशाचा कॅन्सर होण्याची अधिक भीती असते.
-
जे एकापेक्षा अधिक लोकांसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, त्यांना घशाचा कॅन्सर होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे एकपेक्षा अधिक लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवू नये.
-
ओरल सेक्सदरम्यान एचआयव्ही किंवा लैंगिक आजारांची लागण होण्याची भीती असते. या आजारांच्या विषाणूंचा फैलाव शरीरावर झालेली दुखापत, जखमा किंवा फोड यांच्या माध्यमातूनही होऊ शकतो.
-
जीभ आणि टॉन्सिलशी संबंधित कोणतेही आजार उद्भवल्यास डॉक्टरांकडे जावे. शरीरात काही त्रासदायक बदल जाणवल्यास तातडीनं वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा) (फोटो सौजन्य: freepik\संग्रहित छायाचित्र)

अखेर मुसक्या आवळल्या, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी केली अटक