-
तुम्हाला पावसाळा आवडतो का? धो धो कोसळण्याऱ्या पावसामध्ये भिजत, जंगलातील छोट्याश्या पायवाटेने, उंच डोगरांवर जाऊन उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवेगार डोंगर पाहायला किंवा एखाद्या नदी किंवा समुद्र किनारी फिरायला जायला कोणाला आवडणार नाही.
-
तुम्ही देखील मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबासह पावसाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करताय का? पण कुठे फिरायला जावे समजत नाहीये? काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.
-
आम्ही तुम्हाला काही असे ठिकाण सुचवणार आहोत जिथे जाऊन सुंदर निसर्ग पाहता येईल आणि पावसाची पुरेपुर मज्जा घेता येईल. एकदा तुम्ही या ठिकाणी भेट दिली तर तुम्हाला परत येण्याची इच्छा होणार नाही.
-
चला तर मग जाणून घेऊ या ऑगस्टमध्ये फिरण्यासाठी पावसाळी ठिकाणे
-
मुन्नार
पर्यटकांच्या सर्वात आवडत्या ठिकाणांपैकी एक म्हणजे केरळचे मुन्नार हिल स्टेशन. ऑगस्ट महिन्यात भेट देण्यासाठी हे एक अद्भुत ठिकाण आहे. येथे तुम्हाला धबधबे, खळखळ नद्या, वन्यजीवन, अभयारण्ये आणि धुक्याची चादर ओढलेले सुंदर डोंगर पाहता येतील. मुन्नारमध्ये ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी काही उत्तम चहाच्या बागा आणि पायवाटा देखील समाविष्ट आहेत. तुम्ही इथल्या कार्मेलागिरी एलिफंट पार्कमध्ये हत्तींच्या सफारीचा आनंद घेऊ शकता आणि कुंडले तलावात बोटिंगचा आनंदही घेऊ शकता. -
जोग फॉल्स
कर्नाटकातील जोग फॉल्स हा देशातील सर्वात उंच धबधबा आहे. येथे सुमारे ८२९ फूट उंचीवरून पाणी खाली कोसळते. येथे तुम्ही डोंगरांच्या मधोमध बसून या सुंदर धबधब्याचा आनंद घेऊ शकता. विशेष म्हणजे या धबधब्याचा आवाज अनेक किलोमीटर अगोदर ऐकू येतो. -
शिलाँग
शिलॉंग (North east places for hangout in monsoon) हे ईशान्येकडील शहर आहे जे पावसाळ्यात हँगआउटसाठी उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हाला पाऊस आणि ढगांचा लपंडाव पाहायला आवडत असेल तर हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. त्यामुळे तुम्ही हे देखील तुमच्या यादीत समाविष्ट करू शकता. -
ओरछा
हे मध्य प्रदेशातील निवाडी जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक शहर आहे ((Best places for travel in MP month of August) जिथे संध्याकाळ खूप सुंदर असते. तुम्हीही या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे तुम्ही जहांगीर महाल, राज महाल आणि रामराजा मंदिर पाहू शकता. रामराजा मंदिराची कथा अशी आहे की, हे एकमेव मंदिर आहे जिथे रामाची राजा म्हणून पूजा केली जाते. येथे ४०० वर्षांपूर्वी रामाचा राज्याभिषेक झाला होता. -
गोवा
पावसाळ्यात तुम्ही (Goa in monsoon season) गोव्याच्या बीच सिटीलाही भेट देऊ शकता. येथे सुंदर समुद्रकिनारा आणि सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याचा आनंद घेता येतो. येथे तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर काही निवांत वेळ घालवू शकता. इथे तुम्हाला खूप शांतता मिळेल. हे ठिकाण जोडप्यांसाठी सर्वोत्तम आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य