-
पुण्यातील नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी लोकसत्ताशी बोलताना डोळ्यांच्या साथीपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे याविषयी माहिती दिली आहे.
-
डॉ. राजेश पवार सांगतात की, आय फ्लू हा एक प्रकारचा डोळ्याचा संसर्ग असतो. यामध्ये डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
-
डोळे येणे याला आय फ्लू किंवा कंजक्टिव्हायटीज (Conjunctivitis) सुद्धा म्हणतात.
-
आय फ्लूचे तीन स्टेज आहेत व त्यानुसार औषध घेणे आवश्यक आहे. “पहिल्या स्टेजमध्ये व्यक्तीला डोळ्यांमध्ये काहीतरी खूपत असल्याप्रमाणे सौम्य वेदना जाणवत असतात यावेळी अॅंटीबायोटिक घ्यावे.
-
पण जेव्हा डोळ्यांचा त्रास तीव्र स्वरुपाचा असेल तेव्हा अँटीबायोटिक स्टेरॉइड (Antibiotics with Steroid) घ्यावे.
-
तिसऱ्या स्टेजमध्ये डोळ्यांना तीव्र वेदना, डोळे सुजणे, पापण्या सुजणे ही लक्षणे दिसली तर अँटीबायोटिक स्टेरॉइड (Antibiotics with Steroid) घेऊन तज्ज्ञांची भेट घ्यावी.
-
आय फ्लूची सुरुवातीला लक्षणे दिसताच एक घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्यात स्वच्छ कापूस ओला करून त्याने डोळे पुसावे. यामुळे डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं
-
याशिवाय काही घरगुती उपाय म्हणून आपण कापूर जाळून धूरी करू शकता यामुळे डोळ्यातील घाण अश्रूंवाटे बाहेर पडण्यास मदत होते.
-
एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील पु बाहेर पडण्यास मदत होते.
-
चांदीच्या स्वच्छ दागिन्यांना काहीवेळ पाण्यात ठेवावे व मग ते पाणी डोळ्यात थेंबभर टाकल्याने आराम मिळतो.
-
ग्रीन टीच्या वापरलेल्या बॅग थोड्यावेळ फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्या डोळ्यावर ठेवल्याने थंडावा मिळतो.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. डोळ्याची साथ पसरत असताना गरज भासल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”