-
अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीच्या मते, सूर्याच्या UVA किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या पडतात.
-
सूर्याची किरणं काचेतून त्वचेत जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही खिडकीजवळ बसत असाल आणि नियमितपणे सनस्क्रीन न लावल्यास तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते.
-
सूर्यप्रकाशात काम करताना त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन अत्यावश्यक आहे. त्वचेच्या कर्करोगास सूर्यप्रकाशातील UVB किरणं कारणीभूत असतात.
-
तज्ज्ञांच्या मते, UV किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींवर परिणाम होऊ शकतो. मग त्वचेला या नुकसानीपासून कसे वाचवता येईल? जाणून घ्या
-
तुम्ही घरामध्ये असाल तरीही नियमितपणे सनस्क्रीन लावा : तज्ज्ञांनी सकाळी ९ वाजता आणि दुपारी १ वाजता दोनदा सनस्क्रीन लावण्याची शिफारस केली आहे. जर तुम्ही घराबाहेर असाल, तर २ तासांच्या अंतराने दिवसभर सनस्क्रीन लावा.
-
मान, चेहरा, कान व पायावर सनस्क्रीन लावावे. तुमच्या पाठीसाठी स्प्रे सनस्क्रीन वापरणे हा एक सोयीस्कर पर्याय आहे.
-
सकाळी अँटीऑक्सिडंट सीरम वापरा: तज्ज्ञांनी सकाळी व्हिटॅमिन सी, अॅझेलेइक अॅसिड, फेरुलिक अॅसिड आणि बॅकुचिओल यांसारखे अँटीऑक्सिडंट सीरम वापरण्याची शिफारस केली आहे.
-
शक्यतो दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळा : दुपारी UVA आणि UVB किरणांसह सूर्यकिरणांचे प्रमाण जास्त असते जे तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, त्यामुळे दुपारी बाहेर जाणं टाळा.
-
लांब-बाह्या असलेले सैल कपडे घाला: सूर्याच्या धोकादायक UVA आणि UVB किरणांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण-बाह्यांचे सैल व सुती कपडे घाला.
-
छत्री आणि सनग्लासेस बाळगा: तज्ज्ञ स्कार्फ किंवा सनग्लासेस वापरून त्वचेला सनप्रूफिंग करण्याचा सल्ला देतात. तुमचे डोळे पूर्णपणे झाकतील आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतील, असे सनग्लासेस वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. (सर्व फोटो – Unplash वरून साभार)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…