-
दरवर्षी आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी गौरवाचा दिवस असतो. (Photo : Pexel)
-
यावर्षीसुद्धा देशभरात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. सगळीकडे तिरंगा, तिरंग्याच्या रंगांचे कपडे, ज्वेलरी दिसत आहेत. (Photo : Pexel)
-
तुम्ही स्वातंत्र्यदिनी काय परिधान करणार आहात? आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिनासाठी काही बेस्ट आउटफिट्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या. (Photo : Social Media)
-
पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक आहे. या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी पुरुष मंडळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान करू शकतात. डेनिम जीन्सवर हा कुर्ता खूप उठून दिसणार. (Photo : amazon)
-
महिला या दिवशी पांढऱ्या रंगाची सलवार किंवा साडी नेसू शकतात. पुरुष आणि महिलांसाठी पांढऱ्या रंगाचे शर्ट किंवा टी-शर्टसुद्धा चांगला पर्याय आहे.
-
जर तुम्हाला हटके आउटफिट करायचा असेल तर तिरंगा रंगांचे आउटफिट घाला. पुरुष या दिवशी केशरी किंवा हिरव्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पॅंट घालू शकतात; तर महिला पांढरी सलवार आणि त्यावर तिरंगा रंगाचा दुपट्टा घेऊ शकतात. (Photo : Pexel)
-
तिरंग्याच्या रंगांवरून एकापेक्षा एक भारी एक्सेसरीज सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. महिला केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात, तर पुरुष केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचे ब्रेसलेट किंवा बॅच लावू शकतात. (Photo : YouTube)
-
स्वातंत्र्य दिनानिमित्त स्लोगन लिहिलेले टी-शर्ट तुम्ही खरेदी करू शकता. हा बेस्ट आउटफिट पर्याय आहे किंवा तुमच्याकडे जर प्लेन टी-शर्ट असेल तर तुम्ही घरीसुद्धा टी-शर्टवर स्लोगन लिहू शकता. (Photo : amazon.in)
-
भारतीय पारंपरिक लूकसाठी तुम्ही नेहरू जॅकेटसुद्धा परिधान करू शकता. जॅकेटवर गुलाबाचे फुल आणि फ्लॅग बॅचसुद्धा लावू शकता. (Photo : Pexel)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख