-
नवरा-बायकोचं नातं हे पवित्र नातं मानलं जातं. लग्नानंतर दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. हे नातं फक्त त्यांच्यापुरतंच मर्यादित राहत नाही, तर या नात्यामध्ये एकामेकांच्या कुटुंबाचासुद्धा तितकाच सहभाग असतो. (Photo : Pexels)
-
सुख, दु:ख, अडीअडचणीमध्ये नवरा-बायको प्रत्येक वेळी एकमेकांचे आधारस्तंभ म्हणून बाजूला उभे असतात. एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना समजून घेतात. विश्वासावर हे नातं टिकतं. (Photo : Pexels)
-
तुम्हाला आदर्श नवरा-बायकोमध्ये असलेले काही खास गुण माहिती आहेत का? आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
नवरा-बायको एकमेकांचा आदर करीत असतील, तर हा एक चांगला गुण आहे. कोणत्याही नात्यात एकमेकांविषयी आदर असणं गरजेचं आहे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते; पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं अपेक्षित आहे. त्यामुळे नात्यातील सलोखा वाढतो. (Photo : Pexels)
-
कोणतंही नातं प्रेमाशिवाय अपूर्ण आहे. ज्या नात्यात प्रेम आहे, ते नातं अधिक मजबूत असतं. प्रेम ही अशी भावना आहे की, ज्यामुळे नातं अधिक घट्ट होण्यास मदत होते. (Photo : Pexels)
-
नवरा-बायकोच्या नात्यात एकमेकांवर प्रेम असणं तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही पार्टनरच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वावर प्रेम करीत असाल, तर तुम्ही एक आदर्श पार्टनर आहात. (Photo : Pexels)
-
लग्नानंतर दोन व्यक्तींचं नवं आयुष्य सुरू होतं. या नव्या आयुष्यात त्यांना एकमेकांची काळजी घ्यावी लागते. अशात एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांच्या आवडी-निवडी जपणं आदर्श जोडप्याचं लक्षण आहे त्यामुळे नातं अधिक मजबूत होऊ शकतं. (Photo : Pexels)
-
माणूस म्हटलं की, चुका या होऊ शकतात आणि आपल्या हक्काच्या माणसाला समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे चूक कितीही मोठी असली तरी पार्टनरला माफ करा. त्यांच्या चुका त्यांना समजावून सांगा; ज्यामुळे नातं बिघडणार नाही. (Photo : Pexels)
-
नवरा-बायको ही नात्याची दोन चाकं असतात. त्यामुळे एका चाकावर कधीही भार किंवा जबाबदारी देऊ नका. दोघांनीही कामं वाटून घ्या; ज्यामुळे नात्यामध्ये समतोल राखता येईल. आदर्श नवरा-बायको नेहमी एकमेकांना सहकार्य करतात. (Photo : Pexels)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”