-
आपल्याला बाहेर फिरताना तहान लागली की लगेच दुकानातून आपण पाण्याची बाटली विकत घेतो.
-
पाणी पिऊन झाल्यानंतर आपण ती एकतर कचऱ्यामध्ये फेकतो किंवा तिचा पुन्हा वापर करण्यासाठी घरी आणतो.
-
तुम्ही जर या बाटलीकडे निरखून पाहिले तर पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिकच्या बाटल्यांवर तुम्हांला आडव्या रेषा दिसतील.
-
पण प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा का बनविलेल्या असतात, तुम्हाला माहिती आहे का?
-
आता त्या रेषा का असतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, या रेषांमागे एक खास कारण आहे.
-
या रेषांचा प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये समावेश का केला जातो, याबाबत खूप कमी जणांना माहिती असेल.
-
पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांच्या डिझाईनमध्ये या आडव्या रेषांचा समावेश करण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. कोणते आहे ते कारण जाणून घेऊया.
-
पाण्याच्या बाटल्या हार्ड प्लास्टिकपासून बनवल्या जात नाहीत, तर पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी हार्ड प्लास्टिकऐवजी मऊ प्लास्टिकचा वापर केला जातो.
-
त्यामुळे या रेषा नसतील तर या बाटल्या ने-आण करताना फुटू शकतात म्हणूनच एक संरक्षक आवरण म्हणून या रेषा पाण्याच्या बाटलीचं रक्षण करतात.
-
वास्तविक, बाटल्यांवर बनवलेल्या या रेषाही बाटलीच्या सुरक्षिततेसाठी आहेत. रेषा बाटल्यांवर नसतील तर बाटली तुमच्या हातातून निसटत राहील. बाटल्यांवर केलेल्या या ओळींमुळे, तुम्ही त्या बाटल्यांवर पकडू शकता.
-
अनेकांना वाटत फक्त डिझाईन म्हणून या रेषा आहेत तर असे नाही, सुरक्षितता हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे.
-
(फोटो सौजन्य : freepik)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड