-
निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्यदायी जेवण घेणेही तितकेच गरजेचे आहे. उत्तम आहार हे चांगल्या आरोग्याचे सीक्रेट आहे. (Photo : Social Media)
-
जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. (Photo : Social Media)
-
काही लोकांना वरणभात खूप आवडतो; तर काही लोकांना वरणभात अजिबात आवडत नाही. पण, तुम्हाला वरणभाताचे फायदे माहिती आहेत का? (Photo : Social Media)
-
वरणभात हा एक पौष्टिक आहार आहे. त्यामुळे लहानपणापासून आई-वडील मुलांना वरणभात खाण्याची सवय लावतात. (Photo : Social Media)
-
आज आपण वरणभाताचे फायदे जाणून घेणार आहोत … (Photo : Social Media)
-
वरणभातामध्ये भरपूर प्रोटीन असते त्याबरोबरच ॲमिनो ॲसिडसुद्धा असते; जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे वरणभात नियमिय खाणे गरजेचे आहे. (Photo : Social Media)
-
वरणभातामध्ये फायबर आणि प्रोटीन असते; ज्यामुळे पचनशक्ती सहज वाढते आणि आपली डायजेस्टीव सिस्टीम खूप मजबूत होते. (Photo : Social Media)
-
हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी वरणभात खाणे आवश्यक आहे. कारण- यामध्ये फायबर, मॅग्नेशियम व फोलेटचे प्रमाण अधिक असते. वरणभाताचे सेवन केल्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. (Photo : Social Media)
-
वरणभातामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. वरणभात खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होऊ शकते. (Photo : Social Media)
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न