-
किरण बेदी हे एक असं नाव आहे जे कित्येकांना प्रेरित करणारे आहे. भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्या ७४ वर्षांच्या आहेत, तरीसुद्धा त्या तितक्याच फिट आहेत. (Photo : The Indian Express)
-
किरण बेदींचा फिटनेस मंत्र काय आहे, तुम्हाला माहिती आहे का? एका युट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत किरण बेदी सांगतात की, त्यांनी आजवर कधीही समोसा, कचोरी खाल्ली नाही. (Photo : The Indian Express)
-
तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण, हे खरं आहे. त्यांनी या मागील कारणसुद्धा सांगितले. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
-
किरण बेदी नियमित मेडिटेशन आणि योगा करतात, यामुळे त्या नेहमी फिट असतात. त्या नेहमी हेल्दी डाएट घेण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांच्या डाएटविषयी इतक्या शिस्तप्रिय आहेत की, त्यांनी कधीही समोसा, कचोरी आणि पकोडेसुद्धा खाल्ले नाही. ((Photo : Social Media)
-
किरण बेदी नियमित मेडिटेशन आणि योगा करतात, यामुळे त्या नेहमी फिट असतात. त्या नेहमी हेल्दी डाएट घेण्याचा प्रयत्न करतात. त्या त्यांच्या डाएटविषयी इतक्या शिस्तप्रिय आहेत की, त्यांनी कधीही समोसा, कचोरी आणि पकोडेसुद्धा खाल्ले नाही. ((Photo : Pexels)
-
किरण बेदी पुढे सांगतात की, त्यांना पायी चालायला आवडते. ज्या दिवशी त्या पायी चालल्या नाही, त्या दिवशी त्या एक वेळचे जेवण करत नाही. (Photo : Freepik)
-
मूड सतत बदलणे हा मानवी स्वभाव आहे. जेव्हा किरण बेदी यांचा मूड चांगला नसतो तेव्हा त्या स्वत:ला खूप वेळ देतात आणि स्वत:शीच संवाद साधतात. (Photo : The Indian Express)
-
तिशी किंवा चाळिशीत असणाऱ्या लोकांना त्यांनी सल्ला दिला आहे. त्या म्हणतात, “वयाच्या तिशीत असताना चुकीच्या ठिकाणी आपली एनर्जी वाया घालवू नका आणि आपल्या आयुष्याला योग्य मार्गावर आणा आणि मनाप्रमाणे वागा. (Photo : The Indian Express)
-
चाळिशीत असणाऱ्या लोकांना मात्र त्या म्हणतात, “तुमच्यासाठी जबाबदारी निभावण्याचा हा काळ असतो. आपली जबाबदारी पार पाडा.” (Photo : The Indian Express)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…