-
दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
-
हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे ते प्रतीक आहे. यंदा 30 आणि 31 ऑगस्टला संपूर्ण देशात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे.
-
यंदा जवळपास 200 वर्षांनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही खास योग तयार होणार आहेत. हे योग काही राशींसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतात.
-
रक्षाबंधनाच्या दिवशी शनि आणि गुरू हे दोन्ही ग्रह आपापल्या राशींमध्ये प्रतिगामी राहतील. गुरु ग्रह मेष राशीत आहे आणि शनि कुंभ राशीत प्रतिगामी अवस्थेत आहे.
-
30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजून 46 मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र राहील आणि त्यानंतर शतभिषा नक्षत्र सुरू होईल.
-
हे नक्षत्र 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांपर्यंत राहील. अशा स्थितीत शनि ग्रह शतभिषा नक्षत्रात असेल.
-
सूर्य स्वराशी सिंह राशीत आहे आणि बुध या राशीत प्रतिगामी आहे, त्यामुळे बुधादित्य योग तयार होत आहे.
-
ग्रहांच्या या स्थितीमुळे येणारे यंदाचे रक्षाबंधन काही राशीच्या लोकांसाठी अतिशय आनंददायी ठरू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
-
यावेळी गुरु ग्रह मेष राशीत प्रतिगामी अवस्थेत असेल, जो या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो.
-
सिंह राशीत बुधादित्य योग तयार होणार असून सूर्य मघा नक्षत्रात असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना यावेळी नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
-
कुंभ राशीमध्ये शनि प्रतिगामी अवस्थेत असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photos: Freepik/Pexels/Pixabay/Unsplash)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई